नवी दिल्ली, 23 मे : आपल्या डोळ्यांना दिसणारं दृश्य ते मेंदूपर्यंत संदेशाद्वारे पोहोचवतात आणि मेंदूत त्याबद्दलची प्रतिमा तयार होते. आपल्या पाहण्याच्या क्रियेबद्दलची ही मूलभूत क्रिया सर्वांनाच माहिती आहे; मात्र अनेकदा डोळ्यांना भ्रमही होतात. म्हणजेच समोर असते एक गोष्ट; मात्र आपल्याला भास मात्र दुसऱ्याच गोष्टीचा होतो. यालाच Optical Illusion असं म्हणतात. ऑप्टिकल इल्युजन म्हणजेच डोळ्यांना आणि पर्यायाने मेंदूला बुचकळ्यात टाकणारी काही चित्रं असतात. ही चित्रं मेंदूला खुराक तर देतातच; पण ती चित्रं पाहणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही
(Personality) बरीच माहिती त्यातून कळू शकते, असं म्हटलं जातं. ऑप्टिकल इल्युजन सर्वांना एकसारखंच होत असेल असं नाही. म्हणूनच व्यक्तीला त्या भासाचं आकलन कशा प्रकारे होतं, यावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कळतं.
युक्रेनमधले चित्रकार ओलेग शुपल्यॅक
(Oleg Shuplyak) यांनी काढलेलं एक चित्र ऑप्टिकल इल्युजन प्रकारात मोडणारं असून, ते पाहणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमाच्या प्रकाराची
(Weakness in Love) माहिती त्यावरून मिळते. या चित्राबद्दलची सविस्तर माहिती देणारं वृत्त 'इंडियाटाइम्स'ने दिलं आहे.
ओलेग यांच्या या चित्रात चार वेगवेगळ्या प्रतिमा (Images) दडलेल्या आहेत. चित्र पाहणाऱ्या व्यक्तीला सर्वांत पहिल्यांदा कोणती प्रतिमा दिसते, यावरून ती व्यक्ती कोणत्या प्रकारात येते, हे ठरतं, असं 'YourTango' या वेबसाइटवर दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
हे चित्र पाहिल्यानंतर ज्यांना सर्वप्रथम रिकामी होडी
(Empty Boat) दिसते, त्या व्यक्तींचा प्रेमातला वीकनेस हा असतो, की त्यांना अज्ञात गोष्टींची भीती वाटते. अशा व्यक्तींना नव्या माणसांना भेटणं आणि त्यांच्या प्रेमात पडल्यास भीती वाटते. असं असलं तरीही अशा व्यक्तींनी कायम स्वतःला संरक्षित ठेवण्यापेक्षा आपल्या Love Interest वर विश्वास ठेवला पाहिजे.
या चित्रात डोळ्यांवर गॉगलसारखा मास्क लावलेली एक महिला
(Masked Woman) असल्याचा भास ज्यांना चित्र पाहिल्या पाहिल्या सर्वांत आधी होतो, त्यांच्यासाठी प्रेमाचा पाठलाग करणं ही सर्वांत आवडीची गोष्ट असते. म्हणजेच प्रेमाला कायदेशीर स्वरूप मिळण्याआधीची अगदी सुरुवातीची स्थिती अशा व्यक्तींना खूप आवडते. अशा व्यक्ती या दिवसांचा आनंद घेतात. अर्थात, सुरुवातीचे आकर्षणाचे दिवस मजेचे असले, तरी घट्ट बंध निर्माण होणंही तितकंच महत्त्वाचं असतं. या प्रकारातल्या बहुतांश व्यक्ती एकाच जोडीदारावर निष्ठा ठेवणाऱ्या असतात.
काही व्यक्तींना या चित्राकडे पाहिल्यावर होडीवाल्याचं
(Boatman) दर्शन आधी होतं. अशा व्यक्ती जेव्हा प्रेमात पडतात, तेव्हा त्यांना स्वतःच्या भीती, विवंचना यातून सुटका होण्याची संधी मिळते. अशा व्यक्तींसाठी दर दिवशी भीती आणि असुरक्षिततेशी लढा द्याला लागतो. या भावनांतून बाहेर काढणाऱ्या व्यक्तीशी जेव्हा भेट होते, तेव्हा ते खरंच जादुई असतं. अशा भावनेमुळे अशा व्यक्तींची भेट पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटते.
काही व्यक्तींना या चित्राकडे पाहिल्यावर पहिल्यांदा दिसतं ते या चित्रातलं जोडपं
(Couple). या प्रकारातल्या व्यक्तींना प्रेमात सुरक्षिततेची भावना महत्त्वाची असते. या व्यक्तींना त्यांच्या बहुतांश मित्रांप्रमाणे सिंगल राहायला आवडतं; मात्र या व्यक्तींना प्रेम आणि विश्वास असलेल्या व्यक्तींसोबत आयुष्य उभं करायलाही खूप आवडतं. प्रेमात सुरक्षिततेची भावना विकसित व्हायला वेळ लागतो आणि ही भावना लादता येत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.