नवी दिल्ली 04 एप्रिल : कोरोनामुळे आता बहुतेक लोक घरुनच ऑनलाईन पद्धतीनं आपलं काम करताना दिसतात. यादरम्यान सरकारी अधिकारी आणि नेत्यांची मीटिंगही झूम अॅपद्वारे ऑनलाईनच (Zoom Meeting) होते. मात्र, या झूम मीटिंगदरम्यान (Viral Video of Zoom Meeting) अनेकदा विचित्र घटना घडल्याचंही समोर आलं आहे. असंच आणखी एक प्रकरण घडलं आहे, दक्षिण आफ्रिकामध्ये. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावरील चर्चेसाठी चाललेल्या मीटिंगमध्ये नेत्याची पत्नी विना कपडे आपल्या पतीच्या मागे येऊन उभा राहिली.
मीटिंगमध्ये उपस्थित नेत्यांनी आणि खासदारांनी त्यांना त्याचवेळी सांगितलं, की त्यांती पत्नी नग्न अवस्थेत सर्वांना आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेत 23 पारंपरिक नेत्यांची संस्था नॅशनल हाऊस ऑफ ट्रेडिशनल लिडर्सचे एक सदस्य Xolile Ndevu मंगळवारी एका बैठकीदरम्यान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत चर्चा करत होते. Xolile Ndevu सांगत होते की पूर्व कॅपटाउनमध्ये डॉक्टरांसोबत मिळून त्या कशाप्रकारे काम करत आहेत. याचदरम्यान अचानक त्यांची पत्नी विना कपडे त्यांच्या मागे दिसू लागली.
लगेचच मीटिंगमध्ये असणाऱ्या एका नेत्यानं त्यांना सांगितलं, की तुमच्या पाठीमागे जी महिला उभी आहे, तिनं व्यवस्थित कपडे घातलेले नाहीत. आम्ही सगळं पाहात आहोत. तुम्ही त्यांना सांगितलं नाही का की तुम्ही मीटिंगमध्ये आहात. हे अत्यंत वाईट आहे, जे आम्ही पाहात आहोत. जेव्हा Xolile Ndevu यांना या गोष्टीची माहिती झाली तेव्हा त्यांनी आपला चेहरा हातानंच झाकून घेतला आणि ते माफी मागू लागले. ते म्हणाले, की यासाठी मला गोष्टीसाठी अत्यंत वाईट वाटत आहे. माझं लक्ष कॅमेऱ्यावरच केंद्रीत होतं आणि मी मागे पाहिलंच नाही. याबाबत दुसऱ्याच दिवशी स्पष्टीकरण देत ते म्हणाले, की ही टेकनिक आमच्यासाठी नवीन आहे आणि याबद्दल आम्हाला प्रशिक्षणही देण्यात आलं नाही. घरच्यांसाठीदेखील हे नवीनच आहे, त्यामुळे आम्ही हे चांगल्या पद्धतीनं शिकून प्रायवसी ठेवू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Live video viral, Video call