मराठी बातम्या /बातम्या /Viral /धक्कादायक! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला; लग्नासाठी पहिल्या पतीला दिला घटस्फोट

धक्कादायक! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला; लग्नासाठी पहिल्या पतीला दिला घटस्फोट

मरिना इंस्टाग्राम

मरिना इंस्टाग्राम

आई आणि मुलाचं नाते हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं, मग ते नातं रक्ताचं असो किंवा सावत्रपणाचं. पण, बदलत्या काळात या नात्यामध्ये बदल झाल्याच्या अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर येत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Maharashtra, India

    मुंबई, 10 फेब्रुवारी- आई आणि मुलाचं नाते हे जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं, मग ते नातं रक्ताचं असो किंवा सावत्रपणाचं. पण, बदलत्या काळात या नात्यामध्ये बदल झाल्याच्या अनेक आश्चर्यकारक बातम्या समोर येत आहेत. ज्या समजल्यानंतर धक्काच बसतो. सख्या आईनं आपल्या मुलाशी लग्न केल्याच्या, आजोबा आणि नातीनं आपापसात लग्न केल्याच्या अनेक घटना गेल्या काही वर्षांमध्ये समोर आल्या आहेत. आता पुन्हा असंच एक प्रकरण समोर आलं आहे. रशियातील एक सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर आपल्या 15 वर्षांच्या सावत्र मुलाच्‍या प्रेमात इतकी वेडी झाली की तिनं त्यासाठी नवराही सोडला. घटस्फोटापूर्वीच ती मुलाकडून गरोदर राहिली आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर तिनं एका मुलीला जन्म दिला.

    मरिना बाल्माशेव्हा असं या महिलेचं नाव आहे. सोशल मीडिया स्टार असलेल्या मरिनाचं 2007 मध्ये, म्हणजेच 16 वर्षांपूर्वी अ‍ॅलेक्सी शाव्हरिनशी पहिलं (Alexey Shavyrin) लग्न झालं होतं. अ‍ॅलेक्सीचं हे दुसरं लग्न होतं आणि त्याला व्लादिमीर नावाचा मुलगा देखील होता. अ‍ॅलेक्सी आणि मरिनाच्या लग्नात व्लादिमीर सात वर्षांचा होता. अ‍ॅलेक्सीनं सांगितलं की, व्लादिमीर जसजसा मोठा झाला तसतसं मरिनाचं वागणं बदलू लागलं. जेव्हा व्लादिमीर विद्यापीठातून सुट्ट्यांसाठी घरी यायचा तेव्हा मरिना त्याच्याशी फ्लर्ट करायची. त्याच्या लैंगिक छळ करायची. अशा परिस्थितीत व्लादिमीरही मरिनाकडे आकर्षित होऊ लागला. दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले आणि मरिना गरोदर राहिली.

    (हे वाचा:19 वर्षांच्या तरुणाची 76 वर्षांची गर्लफ्रेंड, आता होणार त्याच्या बाळाची आई? )

    इन्स्टाग्राम सेन्सेशन असलेल्या मरिनानं तिच्या सावत्र मुलाच्या प्रेमात पतीला सोडण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही दिवसांनी तिनं व्लादिमीरशी लग्न करून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नाही तर, ती व्लादिमीरच्या बाळाची आई होणार असल्याचही जाहीर केलं. सध्या मरिना आणि व्लादिमीरला दोन वर्षांची एक मुलगी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये मरिना पुन्हा गरोदर होती. पण, तिने इन्स्टाग्रामवर बाळाबद्दल कोणतेही अपडेट शेअर केलेले नाही. मरिनाच्या पहिल्या पतीनं तिच्यावर आरोप केले आहेत की, तिनं व्लादिमीरला आपल्या जाळ्यात अडकवलं.

    मरिना आणि तिचा दुसरा नवरा व्लादिमीर आपल्या नवीन आयुष्यात खूप आनंदी आहेत. ते सोशल साइट्सवर आपले फोटो शेअर करतात. सध्या मरिना 37 वर्षांची आहे आणि व्लादिमीर 23 वर्षांचा आहे. तिच्या पहिल्या पतीचं वय 47 वर्षे आहे.

    रशियन ब्युटी मरिना म्हणाली की, जेव्हा मी व्लादिमीरला दुसऱ्या गर्भधारणेबद्दल सांगितलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. पण, त्याच्या चेहऱ्यावर आनंददेखील होता. मरिनाच्या मते, व्लादिमीरचे डोळे जगातील सर्वात सुंदर डोळ्यांपैकी आहेत. अनेक वेळा सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये त्याला बालिश म्हणून रागवतानाही दिसते. एकेकाळी युक्रेनमध्ये काम केलेल्या मरिनानं सांगितलं की, ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगली कमाई करत आहे.

    सावत्र मुलासोबतचं नाते उघड केल्यानंतर मरिना म्हणाली, "माझ्या कमी वयाच्या पतीमुळे (जो एकेकाळी सावत्र मुलगा होता) बरेच लोक आता मला मेक-अप करण्याचा सल्ला देतात. व्लादिमीरला मी आवडते. प्लॅस्टिक सर्जरीमुळे मला मिळाले व्रण, शरीरातील चरबी या सर्व गोष्टी त्याला आवडतात. मी जशी आहे तशीच त्याला आवडते."

    मरिनाचा माजी पती अ‍ॅलेक्सीच्या म्हणण्यानुसार, मरिनानं व्लादिमीरला भुरळ पाडली. माझ्या डोळ्यांसमोर ती माझ्या मुलाशी फ्लर्ट करायची. त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवायची आणि जणू काही घडलंच नाही असं वागायची. मात्र, मरिना सांगते की, पहिलं लग्न तिच्यासाठी नाटकाप्रमाणं होतं. अशा परिस्थितीत मी एक कुटुंब तोडल्याचा पश्चाताप करावा? असा प्रश्न आहे. मरिना म्हणाली, "मी आई-मुलाच्या नातेसंबंधाला काळीमा फासल्याचं मला अनेकदा वाटायचं. मी माझ्या पहिल्या नवऱ्याकडे परत जाऊ का? असा विचारही मनात याचचा. पण, आता तसं वाटत नाही. मी माझ्या नवीन आयुष्यात आनंदी आहे. माझा सध्याचा नवरा, जो एकेकाळी माझा सावत्र मुलगा होता, तो आमच्या मुलांसाठी सर्वोत्कृष्ट पिता ठरत आहे.मरिनाचे (marina_balmasheva) इन्स्टाग्रामवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिथे ती तिच्या पती आणि लहान मुलीसोबतचे फोटो शेअर करते. पहिल्या लग्नानंतर मरिनाचं वजन खूप वाढलं होतं. पण, कठोर परिश्रमानंतर ती आता खूप फिट दिसते.

    First published:
    top videos

      Tags: Lokmat news 18, Viral news