जाहिरात
मराठी बातम्या / Viral / 19 वर्षांच्या तरुणाची 76 वर्षांची गर्लफ्रेंड, आता होणार त्याच्या बाळाची आई?

19 वर्षांच्या तरुणाची 76 वर्षांची गर्लफ्रेंड, आता होणार त्याच्या बाळाची आई?

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर एक प्रकरण काही दिवस चांगलंच चर्चेत होतं. एका 19 वर्षीय तरुणाने शेअर केलेल्या माहितीनंतर तो चांगलाच ट्रोल झाला होता.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : सोशल मीडियावर एक प्रकरण काही दिवस चांगलंच चर्चेत होतं. एका 19 वर्षीय तरुणाने शेअर केलेल्या माहितीनंतर तो चांगलाच ट्रोल झाला होता. या तरुणाने त्याची 76 वर्षांची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने ती त्याच्या बाळाची आई होणार आहे असंही म्हटलं होतं. हे प्रकरण नक्की काय, ते जाणून घेऊयात. हे प्रकरण इटलीतून समोर आलं आहे. इथं 19 वर्षीय जोसेफने टिक-टॉकवर दावा केला होता की त्याची 76 वर्षीय मैत्रीण मिलेना गट्टा लवकरच त्याच्या मुलाला जन्म देणार आहे. दोघांच्या वयात 57 वर्षांचे अंतर आहे. जेव्हा त्यांनी याबाबत सोशल मीडियावर घोषणा केली तेव्हा यूजर्स चांगलेच संतापले आहेत. लोक केवळ त्यांच्या नात्यावरूनच ट्रोल करत नाहीयेत, तर, या वयात महिलेला गर्भधारणा कशी होऊ शकते, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भात ‘टीव्ही 9 हिंदी’ने वृत्त दिलं आहे. हेही वाचा -   लग्नानंतरही पुरुष इतर स्त्रियांकडे का आकर्षित होतात? जाणून घ्या चाणक्यांचं मत जोसेफ व मिलेना हे दोघे पहिल्यांदाच युजर्सच्या निशाण्यावर आले नाहीत. या आधीही 2022 मध्ये जेव्हा त्यांनी त्यांच्या नात्याचा खुलासा जगासमोर केला होता, तेव्हा ही जोडीदेखील ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. लोकांनी त्यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केले होते. अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. यामुळेच आता या कपलने प्रेग्नन्सीशी संबंधित बातमी शेअर केली आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा यूजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.

    News18लोकमत
    News18लोकमत

    त्यांच्या पोस्टवर युजर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘नात्याच्या नावावर काय विनोद चालला आहे.’ तर दुसर्‍या युजरने लिहिले, ‘मला वाटते की हा सगळा प्रँक आहे.’ दरम्यान, जेव्हा हे प्रकरण व्हायरल झाले आणि याची खूप चर्चा होऊ लागली, तेव्हा जोसेफने जॅम प्रेसला त्यांच्या नात्या मागचं सत्य सांगितलं. आपलं नातं खोटं आहे, असं तो म्हणाला. खरं तर, जग ज्याला त्याची गर्लफ्रेंड मानत आहे ती त्याची गर्लफ्रेंड नसून आजी आहे. जोसेफने सुरुवातीला आजीसोबत चेष्टा करताना एक क्लिप अपलोड केली होती आणि ती व्हायरल झाली होती. त्यानंतर या दोघांचं अफेअर असल्याची चर्चा सुरू झाली. पुढे या दोघांनी आणखी एक प्रँक करत आपण पालक होणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, लोक प्रसिद्धीसाठी नात्यांचा गैरवापर करतात, हा मुलगा त्याच्या आजीला गर्लफ्रेंड कसा म्हणू शकतो, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत नेटकरी जोसेफवर टीका करत आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात