जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Viral News Passenger : इंडिगो एअरलाईन्स विमान कंपनीचा सावळा गोंधळ, जायचं एकीकडे पोहचवलं एकीकडे

Viral News Passenger : इंडिगो एअरलाईन्स विमान कंपनीचा सावळा गोंधळ, जायचं एकीकडे पोहचवलं एकीकडे

दिल्लीहून जायचं होतं पाटण्याला, पण पोहोचवलं उदयपूरला; एअरलाइन्सच्या गोंधळामुळे घडली विचित्र घटना

दिल्लीहून जायचं होतं पाटण्याला, पण पोहोचवलं उदयपूरला; एअरलाइन्सच्या गोंधळामुळे घडली विचित्र घटना

दिल्ली विमानतळावर एका प्रवाशासोबत अशी विचित्र घटना घडली आहे.

  • -MIN READ Local18 New Delhi,New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी : विमानाने प्रवास करताना सामानाची अदलाबदल झाल्याच्या घटना आपल्याला ऐकायला मिळत असतात; पण एखाद्या प्रवाशाला जिथे जायचं होतं, ते सोडून दुसरीकडे नेलं गेलं तर? कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण, दिल्ली विमानतळावर एका प्रवाशासोबत अशी विचित्र घटना घडली आहे.

दिल्ली विमानतळावरून त्याला पाटण्याला जायचं होतं; मात्र त्याला उदयपूरला नेण्यात आलं. उदयपूरला पोहोचल्यानंतर त्याला सत्य समजलं. याबाबत त्याने इंडिगो एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. प्रकरणाचं गांभीर्य पाहून प्रवाशाला उदयपूरहून दुसऱ्या विमानाने दिल्लीला आणण्यात आलं. तिथून त्याला पुन्हा पाटण्याला जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं. या संदर्भातलं वृत्त ‘नवभारत टाइम्स’ने दिलंय.

जाहिरात

हे ही वाचा :  तरुणींना पाहताच आऊट ऑफ कंट्रोल झाला रेडा; पुढे जे घडलं ते धक्कादायक; पाहा VIDEO

या प्रकरणाबद्दल विचारण्यात आलं असता चौकशीनंतरच याबाबत माहिती देता येईल, असं इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने सांगण्यात आलं आहे. सूत्रांनी सांगितलं, की ही घटना 30 जानेवारी रोजी घडली. अफसर हुसेन नावाच्या एका प्रवाशाला दिल्ली विमानतळाच्या टी-1 टर्मिनलवरून पाटण्याला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-214 मध्ये बसायचं होतं. त्याऐवजी त्याला टी-1वरूनच उदयपूरला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक 6ई- 319 मध्ये बसवण्यात आलं.

खरं तर संबंधित एअरलाइन्सकडून प्रवासी कोणत्याही फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी त्यांचे बोर्डिंग पास तपासले जातात. पासचं स्कॅनिंगदेखील केलं जातं. असं असतानाही पाटण्याला जाणाऱ्या फ्लाइटऐवजी प्रवाशाला उदयपूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बसवण्यात आलं. ही घटना समोर आल्यानंतर आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

तसंच प्रश्नही उपस्थित केला जातोय, की प्रवासी दुसर्‍या फ्लाइटमध्ये चढला असेल तर त्या फ्लाइटच्या क्रूने बोर्डिंग पास पाहिला नसेल का? तो ज्या सीटवर बसला होता तिथला प्रवासी कुठे होता? या प्रकरणाची माहिती मिळताच प्रवाशाला 30 जानेवारी रोजी उदयपूरहून दिल्लीला येणाऱ्या विमानाने दिल्लीला पुन्हा पाठवण्यात आलं. तिथून दिल्लीत एक दिवसाच्या मुक्कामानंतर त्याला 31 जानेवारीला दुसऱ्या विमानाने पाटण्याला पाठवण्यात आलं.

जाहिरात

हे ही वाचा :   अरे बापरे! घोडा झाला ‘श्वान’; CCTV मध्ये भयंकर दृश्य कैद, VIDEO पाहूनच धडकी भरेल

एअरलाइन्सकडून बऱ्याचदा अशा चुका होतात, ज्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होतो. काही वेळा प्रवाशांचं सामान त्यांच्या जाण्याच्या ठिकाणाऐवजी दुसऱ्या फ्लाइटमध्ये पाठवलं जातं. त्यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत; पण या वेळी तर चक्क प्रवाशालाच जिथे जायचं होतं, ते सोडून भलतीकडे पाठवण्यात आलं.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात