Home /News /viral /

हा फोटो एकदा नीट पाहा, Optical Illusion संबंधित या फोटोमध्ये दडलंय अनोखं रहस्य

हा फोटो एकदा नीट पाहा, Optical Illusion संबंधित या फोटोमध्ये दडलंय अनोखं रहस्य

आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोदेखील खूप चर्चेत आहेत. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये वरकरणी एका माणसाचा चेहरा दिसतो (Optical Illusion photo of man with English letter) पण त्यासोबतच त्यात एक रहस्य दडलेलं आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी: आपल्यापैकी अनेकांची सोशल मीडियावर (social media) अकाउंट्स असतील. दिवसातील बराचसा वेळ आपण विविध सोशल मीडिया साईट्सवर घालवतो. काहींना तर जवळपास त्याचं व्यसन लागल्यासारखच आहे. दिवसभर ते सोशल मीडियावर असतात. कारण सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचा (Timepass) मुख्य पर्याय बनला आहे. सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या गंमतीशीर व्हिडिओसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज् (Tricky Viral Photo), रिडल्स, ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न या ठिकाणी व्हायरल होतात. लोकांना देखील असे गोंधळात टाकणारे रिडल्स आणि लॉजिकल रिझनिंगशी (Logical reasoning question) संबंधित प्रश्न सोडवायला आवडतात. आजकाल ऑप्टिकल इल्युजनशी (Optical Illusion) संबंधित फोटोदेखील खूप चर्चेत आहेत. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये वरकरणी एका माणसाचा चेहरा दिसतो (Optical Illusion photo of man with English letter) पण त्यासोबतच त्यात एक रहस्य दडलेलं आहे. द सन (The Sun) वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच Donut_Playz_7573 नावाच्या युजरनं रेडीट (Reddit) या सोशल मीडिया साइटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो म्हणजे ऑप्टिकल इल्युजनचं उत्तम उदाहरण आहे. पहिल्यांदा हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला चष्मा लावलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग (Face and word in optical illusion) दिसतो. यामध्ये त्या व्यक्तीचं नाक, तोंड, गळा आणि चष्मा यांचा समावेश आहे. पण, या फोटोमध्ये फक्त व्यक्तीच नाही तर तिच्यासोबत एक इंग्रजी शब्दही दडलेला आहे. बारकाईनं निरीक्षण केल्यास तुम्हाला हा शब्द दिसेल. बारकाईनं निरीक्षण केल्यास दिसेल शब्द जर तुम्ही या चित्राचं डाव्या बाजूनं अगदी बारकाईनं निरीक्षण केलं तर तुम्हाला 'Liar' हा इंग्रजी शब्द सहज वाचता येईल. चष्मा असलेले डोळे आणि नाक एल (L) अक्षरानं बनलेले आहेत, तर नाकातील छिद्र आणि त्याच्या वरचा भाग हा आय (I) पासून तयार झालेला आहे. दोन्ही ओठ मिळून A अक्षर तयार होत तर, हनुवटीपासून घशापर्यंतचा भाग R अक्षराच्या रूपात दिसतो. जरी सोशल मीडियावर यापेक्षाही अधिक रंजक ऑप्टिकल भ्रम असले तरी सध्या मात्र हा फोटो लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. फोटोवर लोकांनी केल्या कमेंट अनेक युजर्सनी फोटोवर मजेशीर कमेंट (Comments) करत आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका व्यक्तीनं म्हटलं आहे की, त्याला फोटोमध्ये हॉलिवुड अभिनेता सिल्व्हेस्टर स्टॅलोन दिसत आहे. एकानं म्हटलं आहे, या चित्रात कुणालाही Lair हा शब्द सहजासहजी दिसणार नाही. तर, एकानं म्हटलं आहे की, या फोटोमध्ये 'लेअर' (Lare) हा शब्द लपलेला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होतात ऑप्टिकल इल्युजनचे फोटो काही दिवसांपूर्वी, लेन्स स्टोअरनं एक ऑप्टिकल इल्युजन शेअर केलं होतं. तुम्ही फक्त 30 सेकंद पाहिल्यास तुम्हाला जादू दिसेल, असं सांगण्यात आलं होतं. ट्रॉक्सलर्स फेडिंग (Troxlers fading) या प्रकारातील तो व्हिडिओ होता. त्या व्हिडिओतील राखाडी वर्तुळाकडे जर तुम्ही 30 सेकंद पाहिलं तर त्यातील इतर स्पॉट आपोआप हिरवे होतात. मात्र, ज्या क्षणी तुम्ही मध्यभागी असलेल्या प्लस चिन्हावर लक्ष केंद्रित कराल त्यावेळी त्याच्या सभोवतालचे स्पॉट्स आपोआप नाहीसे होतील. हे ऑप्टिकल इल्युजनदेखील खूप व्हायरल झालं होतं. खरं तर असे रीडल्स किंवा ऑप्टिकल इल्युजन्स लहान मुलांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी वापरले जातात. मात्र, सोशल मीडियामुळे सध्या लहान मुलांसोबतच मोठ्या लोकांचंदेखील चांगलं मनोरंजन होत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: PHOTOS VIRAL

पुढील बातम्या