जाहिरात
मराठी बातम्या / Viral / तब्बल 8 वर्षांनी झाली आई-मुलाची भेट, VIDEO पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

तब्बल 8 वर्षांनी झाली आई-मुलाची भेट, VIDEO पाहिल्यानंतर तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

आईला पाहताच लहान मुलासारखा रडू लागला मुलगा. (फोटो: Instagram/goodnews_movement)

आईला पाहताच लहान मुलासारखा रडू लागला मुलगा. (फोटो: Instagram/goodnews_movement)

Mother Son Video : आई आणि मुलाची तब्बल 8 वर्षांनी भेट झाली. या भेटीचा इमोशनल व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 सप्टेंबर : मुलगा (Son) कितीही मोठा झाला, तरी तो आईसाठी (Mother) लहानच असतो. ती मुलावर आयुष्यभर प्रेम करते. त्यामुळेच आई-मुलाचं नातं (Mother-Child Relationship) हे जगातलं सर्वांत सुंदर, पवित्र नातं समजलं जातं. एखादी व्यक्ती बऱ्याच दिवसानंतर आईला भेटली, तर दोघांनाही खूप आनंद होतो. प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा (Munavwar Rana) यांची एक शायरी आहे, ‘मेरी ख़्वाहिश है की फिर से मैं फ़रिश्ता हो जाऊं, मां से इस तरह लिपट जाऊं की बच्चा हो जाऊं!’ ही शायरी लिहिण्याचं कारण म्हणजे नुकताच एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. मुलगा आणि त्याची आई यांच्या तब्बल 8 वर्षांनी झालेल्या भेटीचा हा व्हिडिओ आहे. या दोघांची भेट झाल्यानंतर दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले आणि घट्ट मिठी मारून दोघंही रडू लागले. काय आहे व्हिडीओ ‘गुड न्यूज मूव्हमेंट’ या इंस्टाग्राम अकाउंटवरून सकारात्मक आणि हृदयस्पर्शी व्हिडिओ (Heart Touching Videos) पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये एक माणूस सुमारे 8 वर्षांनी आपल्या आईला भेटताना (Man Cry Seeing Mother after 8 years) दिसत आहे. तो इतका कालावधी कुठे होता आणि तो त्याच्या आईला का भेटला नाही, याची फारशी माहिती या व्हिडिओसोबत देण्यात आलेली नाही; मात्र या व्हिडिओतलं आई आणि मुलाच्या भेटीचं दृश्य पाहिल्यानंतर कोणाचेही डोळे भरून येतील.

    जाहिरात

    व्हिडिओमध्ये एक माणूस घरात येताना दिसत आहे. घरात आल्यानंतर त्याला समोर त्याची आई दिसते. तिला पाहताच तो स्तब्ध होतो. त्याच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागतात. आई तिच्या मुलाजवळ येते आणि तीदेखील रडायला लागते. मग दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. यामध्ये ही व्यक्ती अगदी एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईला मिठी मारत असल्याचं दिसतं. आईला मिठी मारल्यानंतरही त्याला आपली आई समोर आहे, यावर पूर्ण विश्वास बसत नाही, हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं. 67 वर्षांच्या आजोबांनी केली अशी जादू की एका फटक्यात पटली तरुणी; लग्नालाही तयार झाली या व्हिडिओला 16 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने कमेंटमध्ये म्हटलं आहे, की ‘मला त्या व्यक्तीला पाहून खूप आनंद झाला. फक्त मला एवढीच आशा आहे, की मला माझ्या मृत आईलाही कधी तरी भेटता येईल.’ ‘आईने त्या व्यक्तीला मिठी मारताच, तो तिचा लहान मुलगा झाला,’ अशी कमेंटही या व्हिडिओवर एका व्यक्तीने दिली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात