वॉशिंग्टन, 09 सप्टेंबर : तरुणींना पटवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यांना पटवण्यासाठी किती पापड बेलावे लागतात हे अनेक तरुणांना माहितीच आहे. तिला मिळवण्यासाठी ते काय काय नाही करत. पण तरी सहजासहजी गर्लफ्रेंड होण्यासाठी तयार होत नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एका 67 वर्षांच्या आजोबांनी अशी काही जादू केली 31 वर्षांची तरुणी त्यांना एका फटक्यात पटली. त्यांनी तिच्यासाठी असं काही केलं की ती त्यांच्यासोबत लग्न करायलाही तयार झाली. अमेरिकेतील जॉर्जियात राहणारी 31 वर्षांची डेमिया विलियम्स आणि 67 वर्षांचा जेम्स पार्कर दोघंही 2017 सालापासून एकमेकांना ओळखतात. दोघं सुरुवातीला सोशल मीडियावर भेटले. डेमियाने एक फेसबुक पोस्ट केली होती. ज्यात तिने आपल्याला 50 पेक्षा जास्त वयाच्या श्रीमंत व्यक्तीला डेट करायचं असल्याची इच्छा व्यक्त केली. जेणेकरून तिला आर्थिक मदत मिळेल. जेम्सही मरीनमध्ये काम करत होता. जिथून तो रिटायर झाला. त्याचा घटस्फोटही झाला आहे. त्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याचा मार्ग तो शोधतच होता. त्यामुळे डेमियाची ही पोस्ट पाहून जेम्सने तिला मेसेज केला. दोघांचंही बोलणं होऊ लागलं. हे वाचा - चहावाल्याच्या प्रेमात पडली MBBS डॉक्टर, लग्नही केलं; तिनं त्याच्यात काय पाहिलं? कसं जुळलं? पाहा हा Love Story Video मिरर यूके च्या रिपोर्टनुसार पार्करने आपल्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट म्हणून आलिशान घर आणि लक्झरी कार दिली आहे. डेमियाची कार चोरी झाली होती तेव्हा त्याने तिला 37 लाख रुपयांची गाडी गिफ्ट केली. 2019 साली त्याने तिला आलिशान घर गिफ्ट केलं. या घराची किंमत £340k म्हणजे तब्बल 2 कोटी 70 लाख रुपये आहे. या घरात दोघं एकत्र राहू लागले. दर आठवड्याला दोघं डेटिंगला जातात ज्याचा सर्व खर्च जेम्सच करतो. डेमिया हळूहळू जेम्सच्या प्रेमात पडली. डेमिया सांगते, जेम्स 67 वर्षांचा असला तरी तो खूप एनर्जेटिक आणि अॅक्टिव आहे. तो मला नेहमी मी स्पेशल असल्याचं दाखवून देतो. त्याने माझं आयुष्यच बदलून टाकलं. हे वाचा - Love story : शेजारी बसली आणि बनली गर्लफ्रेंड; कपलची ‘बसवाली लव्ह स्टोरी’ चर्चेत डेमिया आणि जेम्स यांनी एंगेजमेंटही केली आहे. आता दोघंही लग्न करण्याचं प्लॅनिंग करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.