मुंबई, 10 फेब्रुवारी- पती-पत्नीच्या नातेसंबंधांत किरकोळ गोष्टींना जास्त महत्त्व असते. आजकाल एखादी किरकोळ गोष्ट या नातेसंबंधात वितुष्ट निर्माण करू शकते. सध्या ऑस्ट्रेलियातील एक कपल अशाच एका विचित्र कारणामुळे चर्चेत आहे. एका किरकोळ गोष्टीमुळे या कपलमध्ये वाद निर्माण झाला असून, या वादात पतीने पत्नीला माफ करण्यास नकार दिला आहे. जेवण केल्यानंतर ढेकर देणं ही नैसर्गिक क्रिया आहे. त्याचप्रमाणे फार्ट म्हणजे पादणं हीदेखील नैसर्गिक आहे. पत्नी सतत फार्ट करत असल्याने पती चिडला आणि या वरून या दोघांमध्ये वाद झाला. या वादात पतीने पत्नीला माफ करण्यास नकार दिला आहे. हा वाद नेमका कसा आहे, ते जाणून घेऊया.
मानवी जीवनात काही गोष्टी नैसर्गिक असतात. जेवणानंतर ढेकर येणं ही नैसर्गिक क्रिया आहे. कोणताही माणूस ही क्रिया रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे फार्ट करणं म्हणजे पादणंदेखील नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे या क्रियेसाठी घृणास्पद वाटण्याचं काहीच कारण नाही. मात्र समाजात किंवा सार्वजनिक ठिकाणी फार्ट करणं हे विचित्र मानलं जातं. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर फार्ट केलं तर तो तुम्हाला काहीतरी बोलू शकतो. काही लोक ही गोष्ट जास्त सीरियसली घेतात. ऑस्ट्रेलियातील एका कपलमध्ये फार्टवरून वाद निर्माण झाले आहेत.
(हे वाचा: धक्कादायक! स्वतःच्या मुलापासून गरोदर राहिली महिला; लग्नासाठी पहिल्या पतीला दिला घटस्फोट)
एम्मा नावाच्या महिलेच्या लग्नाला नऊ वर्ष झाली आहेत. ती सध्या तिचा पती रोबसोबत राहते. पण रोबला एम्माच्या काही गोष्टी अजिबात आवडत नाहीत. यात फार्टची सवय समाविष्ट आहे. सर्वसामान्यपणे पती आणि पत्नी एकमेकांच्या या नैसर्गिक प्रक्रियेकडे फारसे लक्ष देत नाहीत. पण एम्माचा पती रोब तिच्या या गोष्टीवर प्रमाणापेक्षा जास्त लक्ष देतो. ``तुमच्या पतीसमोर फार्टिंग करणं हे घृणास्पद आणि वाईट कृत्य आहे, त्यामुळे पत्नीनं चुकूनही हे कृत्य करू नये, ``असं एम्मा सांगते.
रोबने एम्माला यापूर्वी अनेकदा फार्टिंग न करण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर एम्माने देखील विचार केला आणि रोबसमोर फार्टिंग न करण्याचा निश्चय केला. पण एका रात्री ती या क्रियेवर नियंत्रण ठेवू शकली नाही. यानंतर रोब तिच्यावर चिडला आणि तिला या गुन्ह्यासाठी माफ करण्यास नकार दिला. या घटनेनं एम्मा हादरून गेली आहे. फार्टिंग हे सामान्य आहे, असं एम्माला वाटत असलं तरी तिच्या पतीला ते असामान्य वाटतं.
`डेली मेल`च्या वृत्तानुसार, एम्मा अजूनही त्या रात्रीचा प्रसंग विसरण्याचा प्रयत्न करत आहे. त्या रात्री पिझ्झा खाल्ल्यानंतर ती झोपी गेली. त्यावेळी तिनं चुकून फार्ट केलं. त्यानंतर तिचा पती रोब तिच्यावर जाम चिडला. खरंतर त्यावेळी एम्मानं रोबची माफी मागितली. पण त्याने माफ करण्यास नकार दिला. ही घटना तिला वारंवार आठवत आहे. एम्मानं सांगितलं, ``या घटनेनंतर रोब मला म्हणाला की एखाद्या स्त्रीने विशेषतः पतीसमोर फार्टिंग ही सर्वात वाईट गोष्ट आहे. यानंतर आमच्यात वाद झाले. माझ्या चुकीसाठी रोबने मला माफ केले नाही.``
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lokmat news 18, Viral news