मराठी बातम्या /बातम्या /Viral /`या` 10 दुर्घटनांमध्ये सेल्फीचा मोह ठरला मृत्यूला आमंत्रण देणारा, पाहा भयानक PHOTOS

`या` 10 दुर्घटनांमध्ये सेल्फीचा मोह ठरला मृत्यूला आमंत्रण देणारा, पाहा भयानक PHOTOS

(प्रतीकात्मक फोटो: Canva)

(प्रतीकात्मक फोटो: Canva)

आज आम्ही तुम्हाला अशा 10 दुर्घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात सेल्फी घेणं हे लोकांसाठी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं झालं आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • New Delhi, India

  मोबाईलमधील कॅमेरात बदल झाल्याने त्याचा दर्जा अधिक सुधारला आहे. त्यामुळे लोकांमध्ये फोटो काढण्याची क्रेझ वाढत चालली आहे. आजकाल प्रत्येकजण फोटोग्राफर बनला आहे. सध्या बहुतांश लोक सेल्फी काढताना दिसतात. अनेकदा सेल्फी काढण्याच्या नादात लोक आपला जीव धोक्यात घालतात. मात्र या गोष्टीची जाणीव त्यांना नसते. मात्र जेव्हा ही जाणीव होते, तेव्हा फार उशीर झालेला असतो. आज आम्ही तुम्हाला अशा 10 दुर्घटनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात सेल्फी घेणं हे लोकांसाठी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं झालं आणि या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

  वेल्समधील ब्रेकन बीकन नॅशनल पार्कमध्ये 2015 मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. येथे गिर्यारोहणासाठी आलेल्या एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला होता. ही व्यक्ती सेल्फी स्टीकच्या माध्यमातून स्वतःचे फोटो काढत होती, त्यावेळी धातूपासून बनलेल्या सेल्फी स्टीकवर अचानक वीज पडली आणि शॉक लागून या व्यक्तीचा मृत्यू झाला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  2018 मध्ये पनामा येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली.येथे दोन मुलांची आई आणि शिक्षिका असणारी एक महिला एका इमारतीच्या 27 व्या मजल्यावरील रोलिंगवर बसून सेल्फी काढत होती. शेजारी एका इमारतीचं बांधकाम करणारे लोक तिला असं कृत्य करण्यापासून रोखत होते आणि तिचा व्हिडिओदेखील काढत होते. मात्र अचानक तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली.या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  चीनमधील लिओनिंग प्रांतातील प्राणीसंग्रहालयात पाण्यात असलेल्या वॉलरस प्राण्यासोबत एक व्यक्ती सेल्फी घेत होता. यावेळी प्राण्याने त्या व्यक्तीला मागच्या बाजूने पकडून पाण्यात ओढले आणि तिथं त्याचा बुडून मृत्यू झाला. हा फक्त त्या प्राण्याचा खेळण्याचा प्रकार होता, असं प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  नागपूरच्या मंगरूळ तलावात 2015 मध्ये धक्कादायक घटना घडली होती. आठ लोक तलावातील बोटीमध्ये चढले आणि सर्वजण सेल्फी घेण्यासाठी बोटीच्या एका भागाकडे गेले. यामुळे अचानक बोट उलटली आणि सर्वजण बुडू लागले.या आठ लोकांचे तीन सहकारी किनाऱ्यावर होते त्यांनी या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या दुर्घटनेत एकाचे प्राण वाचले तर सात जण बुडून मृत्यूमुखी पडले.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  17 वर्षाचा एक युवक एका बर्थडे पार्टीसाठी मित्रांसोबत समुद्र किनारी गेला. बांगुई विंडमिल जवळ सर्वजण सेल्फी घेत असताना अचानक समुद्रात जोरदार लाट उसळली आणि तरुण वाहून गेला. या घटनेत तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  2014 मध्ये अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे एका कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला होता. कार वेगात असताना तिनं सेल्फी काढला आणि फेसबुकवर पोस्ट केला. दरम्यान मोबाईल पाहत असताना तिची कार एका ट्रकला धडकली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  काही वर्षांपूर्वी सायबेरियातील ऊरल भागात दोन रशियन सैनिक हातात ग्रेनेड घेऊन सेल्फी काढत होते. त्यावेळी ग्रेनेडचा अचानक स्फोट झाला आणि या सैनिकांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या.मात्र या दोघांपैकी एकाचा स्मार्टफोन स्फोटातून वाचला. या फोनमध्ये सेल्फी कैद झाला होता.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  रोमानियातील एका 18 वर्षाच्या मुलीला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी एका विचित्र सेल्फीची कल्पना सुचली. रेल्वेच्या टपावर चढून सेल्फी काढण्याची तिची इच्छा होती.ती एका थांबलेल्या रेल्वेच्या टपावर चढली पण त्यावेळी तिच्या अंगावर विजेची तार पडली आणि 27 हजार व्होल्ट करंट लागून तिचा जागेवर मृत्यू झाला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  मे 2018 मध्ये ओडिशातील एक जण जंगली अस्वलासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. ही व्यक्ती जंगलात फिरत असताना त्याला जखमी अस्वल दिसले. या अस्वलासोबत सेल्फी काढण्याच्या विचारात असतानाच अस्वलाने त्या व्यक्तीवर हल्ला केला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  स्पेनमधील पॅम्प्लोना येथे उत्सवानिमित्त बैलासोबत धावण्याची प्रथा खूप लोकप्रिय आहे. यात अनेकदा लोक मरण पावतात. काही वर्षांपूर्वी 32 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू धावताना नव्हे तर बैलासोबत सेल्फी काढताना झाला. ही व्यक्ती रस्त्याच्या मधोमध आली आणि सेल्फी घेऊ लागली. मागून एक बैल आला आणि त्याने या व्यक्तीवर हल्ला केला. या हल्ल्यात व्यक्तीच्या जांघेला आणि गळ्याला गंभीर जखम झाली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  (प्रतीकात्मक फोटो: Canva)

  First published:

  Tags: Death, Selfie, Selfie photo