पाटणा 23 जुलै : प्रियकराला भेटण्यासाठी एक तरुणी तिच्या गावातील वीजच घालवायची. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला. गावातील काही तरुणांनी लाईट सतत का जाते यामागचं कारण शोधून काढलं. तेव्हा समजलं, की गावातील एक तरुणी प्रियकराला भेटण्यासाठी रात्री वीजपुरवठाच बंद करत असे. याबाबत समजताच गावकऱ्यांनी एके दिवशी अंधारात प्रियकर-प्रेयसीला रंगेहाथ पकडलं. बिहारमधील बेतिया येथून हे धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील नौतनमध्ये प्रीती नावाच्या तरुणीने आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी संपूर्ण गावाचा वीजपुरवठा खंडित केला होता. वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. एक दिवशी बाहेरचा एक मुलगा गावात पोहोचल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडने पुन्हा वीजपुरवठा बंद केला. संधीची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं. त्यानंतर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. Shocking News: पहिल्या पत्नीचा तो व्हिडिओ बघत होता पती; दुसऱ्या पत्नीने रागात प्रायव्हेट पार्टच कापला युवक जवळच्याच गावातील असून राजकुमार असं तरुणाचं नाव आहे. मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे प्रकरण वाढल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या सहमतीनंतर प्रेमी युगुलाने पोलीस ठाण्यातच विवाह केल्याचं सांगण्यात येत आहे. गावकरी संजय कुमार याने आपल्या बागेत प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडल्याचं सांगण्यात आलं. प्रेमी युगल बागेच्या मालकाशीच भांडू लागलं. यानंतर गावकऱ्याने आपल्या मित्रांना बोलावून तरुणाला बेदम मारहाण केली. आणखी एक ग्रामस्थ गोविंदा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी दररोज गावातील वीज कापायची, त्यामुळे घरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. आज तकने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.