मुंबई, 05 सप्टेंबर : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी काळजात धडकी भरवणारे तर कधी प्राण्यांच्या गमती-जमती आणि खोड्या दाखवणारे पण गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून काळजात धडकी तर भरतेच पण त्यापलिकडे भीती आणि आश्चर्यही वाटतं असा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेटट्रेनचा वाद एकीकडे सुरू आहे. अशातच एका बुलेटट्रेनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता डोळ्याची पापणी बंद होऊन उघडेपर्यंत बुलेट ट्रेन निघून गेली आहे. या बुलेटट्रेनचा स्पीड खूप जबरदस्त आहे. या व्हिडीओमध्ये जर नीट पाहिलंत तर 3 ते 4 सेकंदातच ही ट्रेन निघून जाते आणि त्याच वेळी आजूबाजूचा परिसर अगदी या स्पीडने हादरून गेलेला पाहायला मिळत आहे.
Bullet train pic.twitter.com/3K1laEiRoc
— Miles (@mileso1) October 2, 2020
हे वाचा- सामान खरेदी करताना अचानक सुपरमार्केटमधील शेल्फ कोसळले आणि…पाहा थरारक VIDEO हा व्हिडीओ 2 ऑक्टोबरला ट्वीटरवर शेअर करण्यात आला होता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. भारतात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न आहे. हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. सरकारनं या संदर्भातील टेंडर ओपन केलं असून भारतातील नामांकित कंपन्या यासाठी बोली लावणार आहेत. या बुलेट ट्रेनसाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असल्यानं या प्रकल्पाला विरोध होत आहे. मोदी सरकार हा प्रकल्प कशा पद्धतीनं पूर्ण करतं हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.