मुंबई, 06 सप्टेंबर : सध्या इंटरनेटवर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पोहायला गेलेल्या व्यक्तीच्या हाताला शार्कनं पकडलं आणि तब्बल 45 मिनिटं त्याच्या हात पकडूनच राहिला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाच्या हाताला शार्क चिकटलेला दिसत आहे. हा व्यक्ती या शार्कला पाहू घाबरला नाही तर हसताना दिसत आहे. हा व्हिडीओ फ्लोरिडामधील असल्याचं सांगितलं जात आहे.
समुद्रात पोहण्यासाठी गेलेला तरुणाच्याा हाताला अचानक शार्कनं पकडलं. शार्क त्याला चिकटून बसला होता. आपला हात शार्कच्या तोंडात आहे हे ऐकून किंवा याची जाणीव झाली तरीही काळजात धस्स होईल आणि मेंदूही सुन्न होईल. फ्लोरिडामध्ये पोहायला गेलेल्या माणसाच्या हातावर एक लहान शार्क दिसला. हे प्रकरण फ्लोरिडाच्या जेन्सेन बीचवरचं आहे.
हे वाचा-स्पायडरमॅनसारखं चढून जवानानं वाचवले महिलेचे प्राण, रेस्क्यू ऑपरेशनचा थरार VIDEO
समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हाताला छोट्या शार्कनं वेगानं पकडलं. तब्बल 45 मिनिटं हा शार्क हाताला पकडून होता. शार्क त्या व्यक्तीचा हात सोडत नव्हता. या संपूर्ण घटनेदरम्यान आणि मदत मिळवितानाही ती व्यक्ती खूप शांत आणि हसत हसत होती.
ही घटना स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शार्कला व्यक्तीपासून दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते. या शार्कला वेगळं करण्यासाठी अखेर तिथल्या माणसांना तिच्या तोंडावर मद्य ओतावं लागलं त्यानंतर शार्कनं या तरुणाचा हात सोडला.