न्यूयॉर्क, 06 सप्टेंबर : अग्निशमन दलाच्या जवानाच्या धौर्याचं समार्थाचं आणि धाडसाचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. न्यूर्याकमधील अग्निशमन दलानं आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
अग्निशमन दलातील ब्रायन क्विनने धाडसी निर्णय घेऊन स्पायडरमॅन साऱखं एका महिलेला वाचवल्यानं त्याची चर्चा सगळीकडे होत आहे. छतावरून रस्सी टाकून लटकत या जवानानं महिलेचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या जवानाचं धाडस पाहून सगळ्यांना स्पायडरमॅनची आठवण झाली.
हे वाचा-MP: रेल्वे स्थानकाजवळ मोठा स्फोट; 30 ते 35 फूट उंच उडाले दगड, पाहा LIVE VIDEO
एका इमारतीच्या 16 व्या मजल्यावर आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. या मजल्यावर एका खिडकीत एक महिला आगीत अडकली होती. या महिलेला 16 व्या मजल्यावरून तातडीनं रेस्क्यू करणं गरजेचं होतं. फायर फाइटर ब्रायन क्वीननं छतावरून रस्सीच्या मदतीनं खाली उतरत या महिलेला रेस्क्यू केलं आहे.
ही घटना पाहिल्यानंतर त्याच इमारतीत राहणाऱ्या एका महिलेने फायरमॅनचे कौतुक केले आणि असे म्हटले की तो स्पायडर मॅन, सुपरमॅन सारखा आला आणि त्याने इमारतीत अडकलेल्या महिलेला वाचवले. हा व्हिडिओ न्यूयॉर्कच्या अग्निशमन विभागाने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर केला आहे. जो शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल झाला.