मयूरभंज, 27 ऑगस्ट : उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. गुजरात, हिमाचल, बिहार, ओडिशा सारखा राज्यांमध्ये तर मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. कुठे गाड्या वाहून जाताना तर कुठे पुराच्या पाण्यात माणसं आणि प्राणी अडकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ओडिशा इथल्या बारीपद शहरात मधुबन परिसरात बुधवारी दोन मजली इमारत कोसळली. मुसळधार पावसामुळे ही इमारत कोसळल्याचं सांगितलं जात आहे. 4 सेकंदात डोळ्यासमोर इमारत कोसळली आहे ही दुर्घटना कॅमेऱ्यात स्थानिकांनी कैद केली आहे. ओडिशा इथे अनेक दिवसांपासून मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे.
At Baripada ... pic.twitter.com/sWRjUecaJE
— तुझे धुंडे थके मेरे नैन..... (@tusargolmaal) August 26, 2020
हे वाचा- 12 वर्षांची मृत मुलगी अंगाला पाणी लागताच उठून बसली, नेमकं काय घडलं? ओडिशामधील 21 जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगानं वारे वाहतील आणि मुसळधार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. या आधी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नदी नाले दुधडीभरून वाहात असल्यानं गावं, शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांमध्ये नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोरोनादरम्यान हे नैसर्गिक संकट ओढवल्यामुळे स्थानिकांसमोर मोठा प्रश्न उभा आहे. पुरात गाड्या, आणि घरातलं सामान वाहून गेलं आहे. तर अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारत कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.