• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • VIDEO: RSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; धायमोकळून रडू लागले गुंड

VIDEO: RSS पदाधिकाऱ्याच्या घरावर दरोडा घालणाऱ्याची अशी अवस्था; धायमोकळून रडू लागले गुंड

RSS च्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर दरोडा टाकणारे नंतर मात्र धाय मोकळून रडू लागले.

 • Share this:
  नोएडा, 1 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) नोएडा (Noida) जिल्ह्यात रात्री उशिरा पोलीस आणि गुंडांमध्ये चकमक झाली. (Encounter) या चकमकीत पोलिसांच्या गोळीबारात तीन गुंड जखमी झाले. जखमी गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. यादरम्यान त्यांचा एक साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, RSS च्या पदाधिकाऱ्यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्या तीन बदमाशांना गोळ्या लागताच ते धाय मोकळून रडू लागले. या दरम्यान तिन्ही बदमाशांनी आरडाओरडा सुरू केला. आता यापुढे मी कधीच नोएडाला येणार नाही, असं ते ओरडून पोलिसांना सांगत होते. जखमी गुंडांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे सांगण्यात येत आहे की, हे बदमाश बऱ्याच काळापासून नोएडामध्ये गाडीच्या काचा तोडून लॅपटॉप आणि अन्य महागड्या वस्तू चोरी करीत होते. हे ही वाचा-VIDEO उधाणलेल्या पाण्यातून तरुणाला स्ट्रेचरवरुन नेताना एकाचा पाय घसरला आणि... अनेक पोलीस ठाण्यांचे पथक त्यांच्या मागावर होते. पोलीस आणि बदमाशांमधील ही चकमक पोलीस स्टेशन सेक्टर 24 परिसरातील स्पाइस मॉलजवळ घडली. जखमी गुंडाचे नाव अमित असून हा दिल्लीच्या मदनगिरीचा रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले की, अमित हा एक कुख्यात चोर आहे. रस्त्यांवर उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडून तो आपल्या साथीदारांसह चोरीच्या घटना करत असे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: