जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आनंद महिंद्रांनी तरुणांना सांगितली महत्त्वाची बिजनेस ट्रिक; 42 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

आनंद महिंद्रांनी तरुणांना सांगितली महत्त्वाची बिजनेस ट्रिक; 42 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

आनंद महिंद्रांनी तरुणांना सांगितली महत्त्वाची बिजनेस ट्रिक; 42 लाख वेळा पाहिला गेला VIDEO

आनंद महिंद्रानी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सोशल मीडियावर (Social Media) कायम विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होताता. काही व्हिडीओंच्या मागील मतीतार्थ लक्षात घेणं गरजेचं असतं. असाच एक व्हिडीओ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आनंद महिंद्रांनी बिजनेसची सोपी ट्रिक समजावून सांगितली आहे. हा व्हिडीओ बदक आणि वाघामधील आहे. ज्यामध्ये वाघाला घाम सुटला आहे. (Anand Mahindra tells young people important business tricks) आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकतच त्यांनी ट्विटरवरुन एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये बदल आणि वाघ दोघांमध्ये लपाछपी सुरू आहे. या व्हिडीओमध्ये एका छोट्याशा तलावात एका बदकाने वाघाच्या नाकी नऊ आणल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ लोकांनी मनोरंजन म्हणून पाहिला असला तरी उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना एक महत्त्वपूर्ण व्यावसायिक शिक्षा दिली आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये, एका छोट्या तलावात बदल व वाघ दिसत आहे. वाघ बदकाजवळ जातात बदक पाण्याच्या आत जातो, आणि दुसरीकडून बाहेर येतो. बदल अक्टिव्ह असल्यामुळे तो काही वाघाच्या हाती लागत आहे. यामुळे वाघाच्या नाकी नऊ आले आहेत. हे ही वाचा- लग्नाला बोलावलं आणि पाहुण्यांकडून घेतली भांडी घासून; वधु-वराचा विचित्र फंडा

जाहिरात

आनंद महिंद्रांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, कोणत्याही मोठ्या मॅनेजमेंट व्याख्यानापेक्षा छोटे, पण सक्रिय असाल तर व्यवसायात फायदे होतील. त्यामुळे मोठ्या कंपन्यांनी नवीन संधीसाठी आपल्या कंपनीत नव्या स्टार्टअप टीम आणि स्टार्टअप कल्चर राबविण्याची गरज आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात