Home /News /viral /

Video : सुंदर तरुणीला पाहून KISS करायला जात होता तरुण, सत्य कळताच गेला पळून

Video : सुंदर तरुणीला पाहून KISS करायला जात होता तरुण, सत्य कळताच गेला पळून

Funny Video : तरुणाची अवस्था पाहून पोट धरून हसाल.

    नवी दिल्ली, 10 जानेवारी : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जवळपास प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या तरी सोशल मीडिया साईटवर आपलं अकाउंट असेल. त्याठिकाणी अनेकजण आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी पोस्ट आणि शेअर करतात. काही जणांना तर सोशल मीडियाची (Social Media) इतकी आवड आहे की, दिवसभरात आपण काय-काय केलं याचेदेखील अपडेट ते सोशल मीडियावर देतात. लोकांच्या अशा सवयींमुळे अनेकदा सोशल मीडिया साईट्सवर अनोखे व्हिडिओज पहायला मिळतात. काही व्हिडिओ गंमतीशीर (Funny Video) असतात तर काही व्हिडिओ लोकांना आश्चर्य व्यक्त करायला लावणारे असतात. असे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral Video) होऊन ट्रेंडिंग (trending) लिस्टमध्ये एकदम टॉपलासुद्धा राहतात. सध्या प्रँक व्हिडिओंना (Prank Video) लोकांची जास्त पसंती मिळते आहे. काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की आपण आपल्या मित्रमैत्रिणींनाही ते शेअर करतो. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणासोबत विचित्र प्रँक करण्यात आल्याचं दिसत आहे. झी न्यूजनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर (Instagram) 'घंटा' नावाच्या एका अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण धबधब्याजवळील पुलावर (bridge) उभा राहिलेला दिसत आहे. त्याच्यापासून काही अंतरावर एक सुंदर तरुणी (Beautiful Girl) उभी आहे. त्या सुंदर मुलीला पाहून तो तरुण हळूहळू तिच्या जवळ जातो. सुरुवातीला तो तिच्या हातावर हात ठेवून स्माईल करतो. त्याला प्रतिसाद म्हणून ती तरुणीदेखील स्माईल करते. तरुणीचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्सपाहून (Positive Response) तरुणाचं धाडस वाढतं आणि तो तिला मिठी मारतो. मात्र, त्यानंतर घटना अशी काही वळण घेते की त्या तरुणाच्या पाया खालची जमीनच सरकते. तो तरुण घाबरून त्या ठिकाणावरून पळ काढतो. पळून जाण्याच्या प्रयत्नात तो तरुण पुलावरून खाली पाण्याच्या प्रवाहात (water stream) पडतो. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे ही वाचा-जॅकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ पाहताना 8 वर्षांच्या मुलाने TVची केली अशी अवस्था पुलावरील ज्या मुलीला सुंदर समजून तो तरुण तिला मिठी (Hug) मारण्याचा प्रयत्न करत असतो ती प्रत्यक्षात एक वृद्ध महिला असते. चेहऱ्यावर मेकअप (Makeup) आणि डोक्यावर केसांचा विग(Wig) लावून तिनं आपलं वय लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. जेव्हा पुलावरील तरुण मुलगा तिची गळाभेट घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तिच्या डोक्यावरील विग खाली पडतो आणि क्षणात कुरूप दिसू लागते. त्या वृद्ध महिलेला पाहून तरुण घाबरून पळून जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणाची झालेली फजिती पाहून ती वृद्ध महिलाही हसताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रँक जाणीवपूर्वक शूट केल्याचं दिसत आहे.
    व्हिडिओतील तरुणाची झालेली फजिती पाहून सोशल मीडिया युजर्सला प्रचंड गंमत वाटत असल्याचं दिसत आहे. कारण आतापर्यंत जवळपास तीन लाख युजर्सनी हा व्हिडिओ लाईक (Like) केला आहे. अनेकांनी त्यावर मजेशीर कमेंट्सदेखील केल्या आहेत.
    First published:

    Tags: Funny video, Instagram

    पुढील बातम्या