Home /News /viral /

जॅकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ पाहताना 8 वर्षांच्या मुलाने TV ची केली अशी अवस्था!

जॅकी श्रॉफचा ‘तेरी मेहरबानियां’ पाहताना 8 वर्षांच्या मुलाने TV ची केली अशी अवस्था!

या 8 वर्षांच्या मुलाने शेजारी असलेली बॅट घेतली आणि TV वर फेकून मारली. यामुळे TV अक्षरश: फुटला.

    भोपाळ, 10 जानेवारी : मध्य प्रदेशातील (Madhy Pradesh News) खरगोनच्या 8  वर्षांच्या मुलाला ‘तेरी मेहरबानियां’ चित्रपटातील कुत्रा इतका आवडला की, त्याने 14 हाजर 32 इंचाची LED तोडली. LED स्क्रिनमधून कुत्रा बाहेर यावा अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने LED वर बॅट फेकून मारली. आई खोलीत आली तर हा पठ्ठ्या म्हणाला की, ब्राउनी बाहेरच येत नाहीये. (MP News : 8 year old boy breaks LED while watching Jackie Shroffs Teri Mehrabaniyan movie) 8 वर्षांचा पीयूष गंगराड़े आपले आई-वडील आणि भावासह ‘तेरी मेहरबानियां’ चित्रपट पाहत होता. हॉटेल संचालक मनीषची दोन्ही मुलं चित्रपट पाहत होते. थोळ्या वेळानंतर आई स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये गेली. वडील काही कामासाठी बाहेर गेले. भाऊदेखील बाहेर निघून गेला. चित्रपटात जॅकी श्रॉफचा साथीदार कुत्र्याच्या प्रामाणिकपणामुळे पीयूषला भरून आलं. LED मधून कुत्र्याला बाहेर काढण्यासाठी पीयूषने जवळच असलेली बॅट उचलली आणि LED वर मारली. LED फुटल्याचा आवाज येताच आई-वडील दोघेही खोलीच्या दिशेने धावले. पाहिलं तर LED वर चिर गेली होती आणि पीयूष तोंड पाडून उभा होता. आईने विचारलं तर तो म्हणाला की, मोती (चित्रपटात कुत्र्याचं नाव) बाहेरच येत नव्हता. हे ही वाचा-VIDEO-तोंडाची आग होतेय तरी हसत मिरची खाते ही चिमुकली; काळीज पिळवटून टाकणारं कारण दोन महिन्यांपूर्वी खरेदी केला होता LED पीयूषचे वडील मनीष गंगराडे यांनी सांगितलं की, त्यांनी दिवाळीत 14 हजारांचा LED खरेदी केला होता. पीयूष दुसरीत शिकतो आणि तो खूप मस्तीखोर आहे. मानसिक विशेतज्ज्ञ डॉ. श्याम नीमा यांनी सांगितलं की, कोरोना काळात मुलांचा मोबाइलसोबत संपर्क वाढला आहे. मोबाइलमधील दृश्य त्यांना प्रत्यक्षातही हवी असतात. अशावेळी पालकांनी मुलांची समजून घालणं गरजेचं आहे. टीव्ही आणि मोबाइल हे केवळ मनोरंजन आणि अभ्यासाचं माध्यम आहे. शक्य तो मुलांना मोबाइल आणि टीव्हीपासून दूर ठेवायला हवं. सतत टीव्ही पाहणे किंवा मोबाइलवर खेळणे मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jackie shroff, Madhya pradesh, Movie shooting

    पुढील बातम्या