मराठी बातम्या /बातम्या /Viral /देशाविषयी अपशब्द उच्चारत सोशल मीडियावर VIDEO केला पोस्ट; अटकेनंतर अशी झाली अवस्था

देशाविषयी अपशब्द उच्चारत सोशल मीडियावर VIDEO केला पोस्ट; अटकेनंतर अशी झाली अवस्था

देशाचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा आणखी एक VIDEO सध्या व्हायरल होत आहे.

देशाचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा आणखी एक VIDEO सध्या व्हायरल होत आहे.

देशाचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याचा आणखी एक VIDEO सध्या व्हायरल होत आहे.

जौनपुर, 28 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातून अत्यंत धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. येथील एका तरुणाने आपल्याच देशासाठी अपशब्दाचा वापर करीत व्हिडीओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर (Social Media Post) पोस्ट केला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तरुणाला अटक करीत त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जोनपूरच्या मछलीशहर येथील आहे. येथे नसीम नावाचा एक तरुण देशाला अभद्र टिप्पणी करीत असल्याचा व्हिडीओ शूट केला होता. पोलिसांनी तरुणावर विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तरुणाची चौकशीही करीत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तरुणाने आपली चूक मान्य केली आहे. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. (VIDEO posted on social media insulting the country This is what happened after the arrest)

हे ही वाचा-धक्कादायक! संतप्त महिलेने 32 व्या मजल्यावरील दोरी कापून कामगारांना हवेत लटकवलं

आता म्हणतो हिंदुस्तान जिंदाबाद..

पोलिसांनी तत्काळ कारवाई करीत तरुणाला अटक केली आहे. यानंतर तरुणाने आपली चूक मान्य केली आहे आणि त्याने सार्वजनिक व्हिडीओच्या माध्यमातून माफी मागितली आहे. तरुणाने सांगितलं की, तो भारतातील नागरिक असून येथील मीठ खातो. माझ्याकडून चूक झाली असून यासाठी सर्व जनतेची माफी मागतो. यानंतर तरुणाने हिंदूस्तान जिंदाबादची घोषणा दिली.

" isDesktop="true" id="624229" >

पोलिसांकडून कडक कारवाई...

तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी कडक कारवाई केली. जोनपुरचे एसपी सिटी डॉ. संजय कुमार यांनी सांगितलं की, आरोपीला अटक केल्यानंतर विविध कारवाई केली जात आबे. यासाठी त्याला कोर्टातही हजर केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, तरुणाने व्हिडीओमध्ये भारताविषयी आक्षेपार्ह शब्दांचा वापर करीत सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती, जी व्हायरल झाली होती. पोलिसांच्या नजरेत ही बाब येताच त्यांनी कारवाई केली आणि आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

First published:

Tags: India, Shocking video viral