मराठी बातम्या /बातम्या /Viral /महिलेनं चक्क साडी नेसून केलं स्कीइंग, VIDEO VIRAL

महिलेनं चक्क साडी नेसून केलं स्कीइंग, VIDEO VIRAL

अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क धोतर (Dhoti) आणि साडी (Saree)  नेसून बर्फावरील स्कीइंग केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क धोतर (Dhoti) आणि साडी (Saree) नेसून बर्फावरील स्कीइंग केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क धोतर (Dhoti) आणि साडी (Saree) नेसून बर्फावरील स्कीइंग केल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली 8 फेब्रुवारी: साधारणपणे कोणताही खेळ खेळताना त्यासाठी विशिष्ट प्रकारचा ड्रेस घालावा लागतो. पण साडी घालून कुणी बर्फावरील स्कीइंग(Skiing) केलेलं तुम्ही पाहिलं आहे का ? अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क धोतर (Dhoti) आणि साडी (Saree)  नेसून बर्फावरील स्कीइंगकेल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून यामध्ये हे दोघं साडी आणि धोतर नेसून बर्फावरील स्कीइंग करताना दिसून येत आहेत.

अमेरिकेच्या मिनेसोटा येथील भारतीय वंशाच्या या जोडप्यानं हा पराक्रम केला आहे. दिव्या मैया असं या मुलीचं नाव असून तिनं आणि तिच्या पार्टनरने बर्फावरील स्कीइंग(Skiing) करण्याचा  निर्णय घेतला. तिथल्या वेल्च या गावातील पर्वतरांगांमध्ये या दोघांनी स्कीइंग करण्याचं ठरवलं. पण यामध्ये नेहमीप्रमाणे न करता काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. यासाठी त्यांनी धोतर आणि साडी नेसून हे करण्याचा निर्णय घेतला. स्कीइंग (Skiing) केल्याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओला खास कॅप्शनही दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by ivya aiya (@divyamaiya)

या पोस्टमध्ये त्यांनी यासाठी प्रेरणा मिळाल्याचं श्रेयदेखील दिलं आहे. दिव्यानं या पोस्टमध्ये  मासूम मिनावाला मेहता, हरिनी सेकर आणि डॉली जैन यांना याचं श्रेय दिलं आहे.  नुकतंच मागील महिन्यात फॅशन इन्फ्लुएन्सर  मासूम मिनावाला मेहताने स्वित्झर्लंडमध्ये साडी नेसून स्वत: स्कीइंगचा (Skiing) व्हिडिओ अपलोड केला होता. यासाठी आपल्याला तिच्यापासून प्रेरणा मिळाल्याचं दिव्यानं म्हटलं आहे. सुरुवातीला मला साडी नेसायला आवडायचं नाही. मी आयुष्यात पहिल्यांदा 10 वीच्या निरोप समारंभात साडी नेसली होती. परंतु यामध्ये मी खूपच असुरक्षित होते. परंतु यानंतर महिलांनी साडी घालून बॅकफ्लिप (Backflip) आणि क्रिकेट खेळल्याचं पाहिल्यानंतर माझा विचार बदलला. कधीही साडी न घालण्याचा निर्णय बदलत मी साडी नेसून स्कीइंग (Skiing) करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता इंफ्लुएन्सर (Influencer) म्हणून आपलं नाव होत असताना खूप वेगळं वाटत असल्याचं दिव्यानं म्हटलंय.

दिव्या हिच्या या  निर्णयामुळं सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. यामुळं आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आणि भीती वाटणाऱ्या गोष्टींपासून आपण स्वतःची सुटका करून घेऊ शकत असल्याचा विश्वास निर्माण होत आहे.

First published:

Tags: Viral videos