मराठी बातम्या /बातम्या /Viral /

हेअर सेटिंगचा गावठी जुगाड, हा Viral Video पाहिलात का?

हेअर सेटिंगचा गावठी जुगाड, हा Viral Video पाहिलात का?

 प्रेशर कुकरचा वापर करून हेअर ड्रेसिंग करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ (Video of two youth using pressure cooker to set hairs goes viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर: प्रेशर कुकरचा वापर करून हेअर ड्रेसिंग करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ (Video of two youth using pressure cooker to set hairs goes viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर सध्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ नव्या (Various types of videos) प्रयोगाचे असतात. भारतात एखाद्या गोष्टीचा दुसऱ्याच गोष्टीसाठी कसा वापर करून घ्यावा, हे दाखवणारे अनेक जुगाड लोक करत असतात. असेच काही जुगाड सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. असाच एक जुगाड सध्या (Viral video on social media) सोशल मीडियावर लोकप्रिय होत आहे.

\

कुकरचा वापर केसांसाठी

अंघोळ झाल्यानंतर केस सेट करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर अनेकजण करतात. मात्र प्रत्येकाकडे हेअर ड्रेसर असेलच असं नाही. मात्र तुमच्यकडे हेअर ड्रायर नसेल तरीदेखील तुम्ही उत्तम प्रकारे केस सेट करू शकता, हे दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करण्यात आला आहे. दोन तरुण कुकरचा वापर कशा प्रकारे हेअर सेटिंगसाठी करू शकतो, हे दाखवतात.

हेअर सेटिंगचा नवा फॉर्म्युला

या व्हिडिओत एका तरुणाने प्रेशर कुकर पकडला आहे आणि दुसरा तरुण त्यातून बाहेर पडणाऱ्या वाफेचा उपयोग करत आपले केस सेट करतो आहे. एक प्रयोग म्हणून हा विचार उत्तम असल्याचं सांगितलं जात असलं तरी हा प्रयोग धोकादायक असल्यामुळे त्यांचं समर्थन करता येणार नसल्याचं काहीजणांचं म्हणणं आहे.

हे वाचा-कॅफेचा विचित्र नियम! आईवडिलांना WELCOME पण मुलांना NO ENTRY

प्रायोगिक पण धोकादायक

हा प्रयोग सुचणं हे चांगलं लक्षण असलं, तरी तरुण ज्या प्रकारे हा प्रयोग करत आहेत, ते अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. जर का प्रेशर कुकर फुटला, तर या तरुणाचं काय होईल, असा प्रश्न काही युजर्सनी उपस्थित केला आहे. तर अनेकांनी ही कल्पना आवडल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Delhi, Lifestyle, Videos viral