मराठी बातम्या /बातम्या /Viral /भर रस्त्यात 2 बैलांची जुंपली भांडणे; 26 सेकंदांच्या VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

भर रस्त्यात 2 बैलांची जुंपली भांडणे; 26 सेकंदांच्या VIDEO मध्ये पाहा काय घडलं?

व्हायरल

व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकरी चांगली पसंती दर्शवताना दिसतात. प्राण्यांचेही अनेक मजेशीर, हटके आणि विचित्र व्हिडीओ समोर येत असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 27 जानेवारी : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्राण्यांच्या व्हिडीओंना नेटकरी चांगली पसंती दर्शवताना दिसतात. प्राण्यांचेही अनेक मजेशीर, हटके आणि विचित्र व्हिडीओ समोर येत असतात. खास करुन प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. अशातच आणखी एक व्हायरल व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालताना पहायला मिळत आहे.

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ दोन बैलांच्या जबरदस्त भांडणाचा आहे. दोघेही भर रस्त्यात एकमेकांना बरोबरीची टक्कर देताना दिसत आहे. हा यूट्युब व्हिडीओ सध्या सोशल मीडियार जोरदार व्हायरल होत असून व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेटकरी व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

" isDesktop="true" id="821056" >

पाणावले, जायबा खान नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले असून 5500 कमेंट्स आल्या आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारे दोन बैल अचानक समोरासमोर येतात. त्यानंतर दोघांमध्ये भांडणं सुरू होते. दोघेही आपली शिंगे एकमेकांना मारताना दिसत आहे. लोक त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात पण ते ऐकत नाहीत. आधी ते खांबाला धडकतो, मग बुलेट बाईकवर. लढाई एवढी भीषण होती की, तमाशा पाहण्यासाठी लोकांची रांग लागली होती. शेवटी एक बैल पराभूत होतो कसा तरी सुटका करून घेतो आणि तिथून पळून जातो.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटमॉर्मवर असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात. लोक असे व्हिडीओ वापरंवार पाहत असतात. त्यामुळे काही क्षणात हे व्हिडीओ व्हायरल होतात. फक्क बैलच नाही तर इतर प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर फिरतात.

First published:

Tags: Top trending, Video viral, Viral, Viral news, Youtube