प्रेक्षकांकडून टीका तुला काय मरायचं आहे का, अशी विचारणा हा व्हिडिओ पाहणाऱ्या एका इसमानं केली आहे. तर दुसऱ्या एकानं लिहिलंय की ही रेसिपी पाहून मी कॉफी बनवली आणि माझ्या पोटात दुखायला लागलं. कॉफीप्रेमी भडकले चहा आणि कॉफी यांचे प्रेमी हे नेहमीच त्या त्या पेयांबाबत केलेला हलगर्जीपणा खपवून घेत नाहीत. चहा भारी की कॉफी यावरूनदेखील सतत वाद घातला जातो. त्यात आता कॉफीसारख्या दैवी पदार्थात टूथपेस्ट वगैरे मिक्स करण्याची कल्पना पाहून अनेकांनी उलटी आल्याची भावना व्यक्त केली आहे. लोकांना अशा रेसिपी सुचतातच कशा, असा सवालही काहींनी उपस्थित केला आहे. हे वाचा- Indian Idol 12: अंजली गायकवाडच्या बहिणीला पाहिलंय का? तीसुद्धा आहे उत्तम गायिका मिल्क शेक मॅगीदेखील झाली होती व्हायरल काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर मिल्क शेक मॅगी नावाची रेसिपी प्रसिद्ध झाली होती. त्यात नेहमीची मॅगी मिल्कशेकमधून घालून बनवण्यात आली होती. त्यावरही अनेकांनी नाकं मुरडली होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coffee, Recipie, Video viral