'इंडियन आयडॉल १२' या सिंगिंग रिऍलिटी शोमुमधून प्रचंड लोकप्रियता मिळवलेली छोटी स्टार म्हणजे अंजली गायकवाड होय. या महाराष्ट्राच्या लाडक्या लेकीला पूर्ण देशाने प्रचंड प्रेम दिलं आहे. अंजली आज सर्वांचीच फेव्हरेट आहे. त्यामुळे तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात.
या छोट्याशा गोड गळ्याच्या अंजलीला आपण सगळेच ओळखतो. मात्र तिच्या बहिणीला तुम्ही पाहिलंय का? आज आपण अंजलीची बहीण नंदिनी गायकवाडबद्दल जाणून घेणार आहोत. नंदिनी गायकवाडसुद्धा एक उत्तम गायिका आहे.
या बहिणी मूळच्या नाशिकच्या आहेत. त्यांच्या वडिलांनी त्यांना उत्कृष्ट असं शास्त्रीय संगीतचं ज्ञान दिलं आहे. नंदिनी गायकवाड हिने हिंदीतील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'सारेगमपा लिटिल चॅम्प'मध्ये सहभाग घेतला होता. आपल्या आवाजाच्या जोरावर तिने टॉप ९ मध्ये स्थान मिळवलं होतं.
त्यांनतर नंदिनी ने आपली बहीण अंजलीसोबत मराठीतील प्रसिद्ध रिऍलिटी शो 'संगीत सम्राट'मध्ये सहभाग घेतला होता. या दोघी बहिणींनी या कार्यक्रमाचं विजेतेपद पटकावलं होतं.
अंजलीप्रमाणे नंदिनीनेसुद्धा अनेक संगीत कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. एकादशीनिमित्त होणाऱ्या विठुरायाच्या कार्क्रमांतही तिने अंजलीसोबत उपस्थिती लावली आहे. यामध्ये तिने आपल्या गोड आवाजात विठुरायाचा गजर केला आहे
नंदिनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो शेअर करून रसिक प्रेक्षकांच्या संपर्कात असते. इतकंच नव्हे तर ती आपल्या गाण्यांचे सुंदर व्हिडीओसुद्धा शेअर करत असते.
ती बहीण अंजली आणि आपल्या वडिलांच्या फारच जवळ आहे. या तिघांमध्ये फारच खास बॉन्डिंग आहे. ती सतत या दोघांसोबत फोटो शेअर करत असते. नुकताच नंदिनीने बहीण अंजलीसोबत मिळून 'अंतर्नाद' हा गायनाचा समर कॉन्सर्ट केला होता. त्याला चांगलीच पसंती मिळाली होती.