मराठी बातम्या /बातम्या /Viral /

एकाच वेळी फणा काढलेले तीन कोब्रा, लोक म्हणाले सुरूय मोठी मीटिंग; पाहा VIDEO

एकाच वेळी फणा काढलेले तीन कोब्रा, लोक म्हणाले सुरूय मोठी मीटिंग; पाहा VIDEO

समोर एकाच वेळी तीन कोब्रा उभे आहेत आणि ते एकमेकांना आव्हान देत आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

समोर एकाच वेळी तीन कोब्रा उभे आहेत आणि ते एकमेकांना आव्हान देत आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

समोर एकाच वेळी तीन कोब्रा उभे आहेत आणि ते एकमेकांना आव्हान देत आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या कॅमेरामनच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: एका वेळी तीन महाभंयकर कोब्रा नाग (Kobra Snakes) फणा काढून एकमेकांसमोर उभे (Standing ahead of each other) असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media Viral) जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर सापाचा विषय काढला तरी अनेकांना भिती (Fear of Snake) वाटते. साप समोर दिसल्यावर आरडाओरडा करणारे आणि शक्यत तितक्या वेगाने त्याच्यापासून पळून जाणारे अनेकजण आपल्याला माहित असतात. साप आणि त्याच्यात असणाऱ्या विषामुळे अनेकांना त्याची प्रचंड भीती वाटत असते. त्यात कोब्रा हा तर अतिविषारी नाग असल्यामुळे कोब्राचं दर्शनही लोक लांबूनच घेणं पसंत करतात. कोब्रा नाग आयुष्यात कधी प्रत्यक्षात समोर येऊन उभा राहिला, तर आपण काय करू याची अनेकांना कल्पनाही करवत नाही.

व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या सोशल मीडियावर तीन कोब्रा नाग एकमेकांसमोर फणा काढून उभे असल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. कोब्रा नागाचं दर्शन दुर्मिळ मानलं जातं. एखादा कोब्रा नाग दिसणं, हे कधी कधी शक्य होतं. मात्र एकाच वेळी एकमेकांच्या समोर उभे राहिलेले तीन कोब्रा नाग पाहणं, हा तर दुर्मिळच योग. हा योग नुकताच जुळून आला आणि एकानं तो कॅमेऱ्यात कैदही केला.

कॅमेरामनचं कौतुक

तीन कोब्रा नाग आक्रमक स्थितीत, फणा काढून समोर उभे असताना कुणीही पळून गेलं असतं. मात्र पळून न जाता हे दृश्य कॅमेऱ्यात टिपणाऱ्या कॅमेरामनचं जोरदार कौतुक होत आहे. त्यानं दाखवलेल्या धाडसामुळे आज लाखो लोकांना हा अद्भूत नजारा पाहायला मिळाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

हे वाचा-कटू सत्य! शिक्षिका असताना होती गरीब, प्रोफेशन बदलल्यावर झाली गडगंज

मजेशीर प्रतिक्रिया

या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया येत आहे. या व्हिडिओत एक साप जीभ बाहेर काढून उभा आहे, तर दुसरा तटस्थपणे त्याच्याकडे पाहत असल्याचं दिसतं. त्यावरून त्यांची काहीतरी महत्त्वाची मीटिंग सुरू असावी, अशी प्रतिक्रिया एका युजरने दिली आहे. तर लवकरच सामना सुरू होणार असून समोर रेफरीदेखील उभा आहे, असं दुसऱ्यानं म्हटलं आहे.

First published:

Tags: King cobra, Poison, Snake, Video viral