जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बॉलिवूडच्या 'अण्णा'चा डुब्लीकेट सापडला, video होतोय तुफान व्हायरल

बॉलिवूडच्या 'अण्णा'चा डुब्लीकेट सापडला, video होतोय तुफान व्हायरल

व्हायरल

व्हायरल

संपूर्ण जगभरात एकमेकांसारखे दिसणारे अनेक लोक सापडतात जे हुबेहुब एकमेकांसारखे दिसतात. त्यांना पाहून अनेक लोक कन्फ्युज होऊन जातात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 26 जानेवारी : संपूर्ण जगभरात एकमेकांसारखे दिसणारे अनेक लोक सापडतात जे हुबेहुब एकमेकांसारखे दिसतात. त्यांना पाहून अनेक लोक कन्फ्युज होऊन जातात. खास करुन सेलिब्रेटींसारखे दिसणारे लोक सापडले की ते सोशल मीडियावर हमखास व्हायरल होतात. त्याचे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. अशातच असाच एका सेलिब्रेटीचा डुब्लीकेट सध्या चर्चेत आला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. सध्या चर्चेत असलेला डुब्लीकेट नक्की कोणा सारखा दिसतो हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बॉलिवूडमधील अण्णा म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टीसारखा दिसणार एक व्यक्ती सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत असून त्याला पाहून नेटकऱ्यांना सुनील शेट्टीची आठवण येत आहे. सुनील शेट्टी त्याची मुलगी अथिया शेट्टीच्या लग्नामुळे तर चर्चेत आहेच मात्र त्याच्या डुब्लीकेटमुळेही तो प्रकाश झोतात आला आहे. हेही वाचा -  प्लॅटफॉर्म अन् रेल्वेच्यामधून फरफटत गेला, चालत्या एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाचा थरारक CCTV Video सुनील शेट्टीसारखी दिसत असलेला व्यक्ती सुनील शेट्टीच्या चित्रपटातील गाण्यांवर अभिनय करताना आणि त्याची नक्कल करताना दिसत आहे. त्यामुळे त्याला पाहून नेटकरी हा तर दुसरा सुनील शेट्टी असल्याचं म्हणत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडिओ मोहम्मद इस्लाम खान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी सारख्या डुब्लीकेट मोहम्मद इस्लाम खान पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

जाहिरात

मोहम्मद हा एक व्हिडीओ क्रिएटर असून तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. त्याचे सोशल मीडियावरही लाखो फॉलोवर्स आहेत. तो सुनील शेट्टीला आपला आदर्श मानतो. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मोहम्मद इस्लाम खान सुनील शेट्टीच्या अनेक हिट डायलॉग्सवर लिप सिंक करताना दिसत आहे. त्याच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही येताना पहायला मिळत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

दरम्यान, कोणत्या सेलिब्रेटीचा डुब्लीकेट इंटरनेटवर धुमाकूळ घालण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेक कलाकारांचे डुब्लीकेट पहायला मिळाले आहेत. त्यांनीही सोशल मीडियावर भरपूर धुमाकूळ घातला आहे. यामध्ये सलमान शाहरुखपासून ते ऐश्वर्या माधूरीपर्यंत अनेक कलाकारांचे डुब्लीकेट समोर आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात