कुंदन जाधव, अकोला, 24 जानेवारी : सोशल मीडियावर रेल्वे स्टेशनवरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असलेले पहायला मिळतात. रेल्वे स्टेशनवर अनेक अपघात, चोरी, भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका व्यक्तीचा जीव थोडक्यात बचावल्याचा पहायला मिळतोय. हा व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
सध्या व्हायरल होत असलेला रेल्वे स्टेशनवरील हा व्हिडीओ अकोल्याचा आहे. सोमवारी रात्री 9.30 वाजताचे सुमारास विदर्भ एक्सप्रेस अकोला रेल्वे स्टेशन येथून रवाना होत असताना एक व्यक्ती ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. ट्रेनमध्ये चढताना त्याचा तोल जाऊन तो प्लॅटफॉर्म व ट्रेनमधील गॅपमध्ये पडत होता. तो व्यक्ती पडत असताना त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले रेल्वे पोलीस विलास पवार यांनी प्रसंगावधान दाखवत पडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर खेचून घेऊन त्याचा जिव वाचवला.
रेल्वे पोलीस विलास पवार यांनी यापूर्वीही 2 दोन वेळा असेच प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी धडकीच भरली असून व्हिडीओमध्येही काही नागरिक सुन्न झाल्याचे दिसून येतायेत. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. रेल्वे आणि पटरीमध्ये अडकलेल्या प्रवाशाचा थराराक व्हिडीओ पाहून काही क्षणांसाठी अंगावर काटा येतोय.
दरम्यान, रेल्वे स्टेशनवरचे यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ट्रेनमध्ये चढण्याच्या उतरण्याच्या गडबडीत अनेकांचा तोल जातो आणि ते खाली पडतात. यामध्ये अनेकांनी आपला जीव गमवावा लागतो तर काहीजण गंभीर जखमी होतात. आजूबाजूला असलेले नागरिक देवदुतासारखे धावून आले तर काहींचा जीव थोडक्यात बचावतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Akola, Akola News, Railway accident, Railway tracks, Social media viral, Videos viral, Viral