मराठी बातम्या /बातम्या /Viral /

आश्चर्यच! पतीच्या प्रेमाला पत्नी वैतागली; म्हणाली...सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल!

आश्चर्यच! पतीच्या प्रेमाला पत्नी वैतागली; म्हणाली...सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल!

सर्वसाधारणपणे पती लक्ष देत नाही म्हणून पत्नी तक्रार करताना आपण पाहिलं आहे. मात्र इथं काहीतरी वेगळंच आहे.

सर्वसाधारणपणे पती लक्ष देत नाही म्हणून पत्नी तक्रार करताना आपण पाहिलं आहे. मात्र इथं काहीतरी वेगळंच आहे.

सर्वसाधारणपणे पती लक्ष देत नाही म्हणून पत्नी तक्रार करताना आपण पाहिलं आहे. मात्र इथं काहीतरी वेगळंच आहे.

  Husband Wife News: पती आणि पत्नीमध्ये (Wife and Husband) अनेकदा वाद पाहायला मिळतो. दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन दोघांमध्ये वाद सुरू असतो. मुद्दा मोठा नसतो, मात्र तरीही वादाशिवाय पती-पत्नीचा दिवस जात नाही. त्यामुळे नियमितपणे घराघरांमध्ये पती-पत्नीमध्ये कडू-गोड नातं पाहायला मिळतं. गेले दोन वर्ष केवळ भारतासाठीच नाही तर जगातील अनेक देशांसाठी आव्हानात्मक ठरलं आहे. लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम असल्यामुळे पती-पत्नी बराच वेळ सोबत होते, जे कदाचित त्यांना इतर वेळेस जमलं नसतं. दरम्यान शेजारील देश पाकिस्तानमधून (Pakistan Video) पती-पत्नीमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पती-पत्नीमधील गोड-कडू अनुभवांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Video Viral On Social Media) खूप पसंत केला जात आहे. (Video of Pakistani husband and wife goes viral on social media) हे ही वाचा-VIDEO: स्टेजवर चढायलाच तयार नव्हती नवरी; नवरदेवानं केलं असं काही की सगळेच हैराण पाकिस्तानी पतीने पत्नीला दिलं असं सरप्राइज पाकिस्तानमधील एका तरुणाने आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी एक फुल दिलं. पाकिस्तानमधील लाहौरच्या एका कंटेन्ट क्रिएटर बिलाल खान (Bilal Khan) याने पत्नी दुआ सिद्दीकीला गुलाब देऊन सरप्राइज दिलं. पत्नीदेखील आपल्या पतीला पाहून लाजली. व्हायरल व्हिडीओ बिलालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ 23 सप्टेंबर रोजी पोस्ट करण्यात आला असून आतापर्यंत दीड लाखवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Bilal Khan (@bilalkhan228)

  पतीला पाहताच म्हणाली... व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पती काही फळं आणि किराण्याचं सामान खरेदी करून घरी परतत आहे. बिलाल पत्नीला गेटच्या बाहेर बोलावतो. आणि तो कारमध्ये तिची वाट पाहत असतो. पत्नी बाहेर येते आणि पतीच्या कारजवळ जाते. कारच्या खिडकीजवळ जाताच बिलाल हातातील गुलाब तिच्यापुढे करतो. त्यानंतर ती लाजते आणि म्हणते, घरात गॅसवर खिमा शिजतोय, आणि इथं तर यांचं प्रेम संपत नाहीये...केळी द्या हातात.

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Video viral, Video Viral On Social Media, Wife and husband

  पुढील बातम्या