मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /डॉक्टरांनी केली ऐतिहासिक कमाल! माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्या डुकराच्या दोन्ही किडनी

डॉक्टरांनी केली ऐतिहासिक कमाल! माणसाच्या शरीरात प्रत्यारोपित केल्या डुकराच्या दोन्ही किडनी

Pig kidneys transplant in human body : आधी डुकराची एक किडनी, त्यानंतर हृदय आणि आता दोन्ही किडनी माणसांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्या आहेत.

Pig kidneys transplant in human body : आधी डुकराची एक किडनी, त्यानंतर हृदय आणि आता दोन्ही किडनी माणसांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्या आहेत.

Pig kidneys transplant in human body : आधी डुकराची एक किडनी, त्यानंतर हृदय आणि आता दोन्ही किडनी माणसांमध्ये प्रत्यारोपित करण्यात आल्या आहेत.

वॉशिंग्टन, 21 जानेवारी : काही दिवसांपूर्वीच माणसाच्या शरीरात एका डुकराचं हृदय प्रत्यारोपित केलं गेलं होतं. आता या दिशेने डॉक्टरांनी आणखी एक मोठं पाऊल टाकलं आहे. हृदयानंतर आता माणसाच्या शरीरात डुकराच्या दोन्ही किडनीसुद्धा प्रत्यारोपित कऱण्यात आल्या आहेत. जगातील हे पहिलं प्रकरण आहे (Pig kidneys transplant in human body).

यूएसच्या बर्मिंघममधील अलबामा युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी हा प्रयोग करून पाहिला. एका ब्रेनडेड रुग्णावर त्यांनी हा प्रयोग केला. 57 वर्षांचे जीम पार्सन्स आधीपासूनच व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या. त्यामुळे ते बरे होण्याची शक्यताच नव्हती. मेट्रोच्या रिपोर्टनुसार  ब्रेनडेड रुग्णावरील या प्रयोगात अवयवाने तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधी काम केलं.

याआधी न्यू यॉर्कमध्ये एका ब्रेन डेड व्यक्तीवर डुकराची एक किडनी प्रत्यारोपित करण्यात आली होती. त्यानंतर डुकराच्या दोन्ही किडनी माणसांमध्ये प्रत्यारोपित कऱण्याची ही पहिलीच वेळ.

हे वाचा - Shocking! ...अन् जिभेवरच उगवू लागले केस; विचित्र समस्येमुळे हैराण झाली महिला

अलबामा युनिव्हर्सिटीतील डॉक्टर  जयमे लोके यांनी सांगितलं, वैद्यकीय इतिहासात हे जेनोट्रान्सप्लांटेशन एक मैलाचा दगड ठरेल. अवयवांच्या कमतरतेच्या समस्येवर एक उत्तम मार्ग असेल. क्रिटिकल नॉलेज गॅरवर यश मिळवत असा अहवाल मिळाला आहे, ज्याच्या मदतीने आम्ही किडनी फेल होण्यासह गंभीर आजारांच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांवर याचं क्लिनिकल ट्रायल करू शकतो.

किडनीच्या समस्या उद्भवल्यानंतर काही प्रकरणात किडनी प्रत्यारोपणाशिवाय दुसरा मार्ग नसतो. अशावेळी एखाद्या जिवंत व्यक्तीची किंवा ब्रेनडेड रुग्णाची किडनी त्या रुग्णाच्या शरीरात प्रत्यारोपित केली जाते. पण काही कारणामुळे लगेच किडनी उपलब्ध होत नाही. किडनीच्या प्रतीक्षेतच असलेले असे बरेच लोक आहेत. वेळेत किडनी न मिळाल्याने त्यांच्या जीवालाही धोका असतो. अशामध्ये हा प्रयोग म्हणजे अशा रुग्णांसाठी मोठा आशेचा किरण आहे.

माणसाला डुकराचं हृदय

याआधी जीवघेणा हृदयविकार असलेल्या एका 57 वर्षीय व्यक्तीला अनुवांशिकरित्या सुधारित डुक्कराकडून हृदय मिळालं आहे (Man Receives a Heart From Pig). डेव्हिड बेनेट असं या व्यक्तीचं नाव असून तो मेरीलँडचा राहणारा आहे. डुकराच्या हृदयाचं मानवामध्ये केलेलं हे पहिलं यशस्वी प्रत्यारोपण आहे (Doctors Transplanted a Pig Heart into a Human). यासाठी आठ तासांचं ऑपरेशन बाल्टिमोर येथे झालं.

हे वाचा - कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने बरा होतो कोरोना? उपायाबाबत डॉक्टर म्हणाले...

शास्त्रज्ञांनी डुकरांच्या अवयवाचा मानवी शरीरात कशा पद्धतीने वापर करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी बरेच परिश्रम घेतले. नवीन जनुक संपादन आणि क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे गेल्या दशकात संशोधनाला वेग आला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle, Organ donation