मराठी बातम्या /बातम्या /Viral /VIDEO: Tokyo Olympic दरम्यान खेळाडू सोडून भलतीकडेच फिरला कॅमेरा; जे कैद झालं त्याचीच रंगली चर्चा

VIDEO: Tokyo Olympic दरम्यान खेळाडू सोडून भलतीकडेच फिरला कॅमेरा; जे कैद झालं त्याचीच रंगली चर्चा

सध्या या ऑलिम्पिकमधील असा एक व्हिडिओ लोकप्रिय होताना दिसतोय, ज्यामध्ये खरं तर एकही खेळाडू नाही. खेळाडूच काय, या व्हिडिओमध्ये एखादा माणूसही नाही

सध्या या ऑलिम्पिकमधील असा एक व्हिडिओ लोकप्रिय होताना दिसतोय, ज्यामध्ये खरं तर एकही खेळाडू नाही. खेळाडूच काय, या व्हिडिओमध्ये एखादा माणूसही नाही

सध्या या ऑलिम्पिकमधील असा एक व्हिडिओ लोकप्रिय होताना दिसतोय, ज्यामध्ये खरं तर एकही खेळाडू नाही. खेळाडूच काय, या व्हिडिओमध्ये एखादा माणूसही नाही

    नवी दिल्ली 29 जुलै : टोकियोमध्ये सध्या ऑलिम्पिक स्पर्धा (Tokyo Olympics 2020) सुरू आहेत. या स्पर्धांमधील कित्येक रोमांचक क्षण कॅमेऱ्यांमध्ये टिपले जाऊन सोशल मीडियावर व्हायरल (Tokyo Olympics viral videos) होताना आपल्याला दिसून येत आहेत. सध्या या ऑलिम्पिकमधील असा एक व्हिडिओ लोकप्रिय होताना दिसतोय, ज्यामध्ये खरं तर एकही खेळाडू नाही. खेळाडूच काय, या व्हिडिओमध्ये एखादा माणूसही नाही. हा व्हिडिओ आहे चक्क एका झुरळाचा!

    एखादी मॅच सुरू असताना मध्ये काही क्षणांसाठी कॅमेरामन प्रेक्षकांमधून कॅमेरा फिरवत असतो. आयपीएल, टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मॅचमध्ये तर या क्षणांमुळे कित्येक प्रेक्षक प्रसिद्धही झाले आहेत. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये प्रेक्षक नाहीत. त्यामुळे की काय, स्पेन आणि अर्जेंटिनाच्या महिला हॉकी मॅचदरम्यान कॅमेरामनने एका झुरळावर कॅमेरा (Cockroach in Olympics) नेला होता. एकीकडे दोन्ही टीममधील खेळाडू गोल करण्याची धडपड करत असताना, कॅमेरामनने मात्र तुरुतुरू चालणाऱ्या या झुरळावर कॅमेरा फोकस केला होता. या मॅचचं थेट प्रेक्षपण होत असल्यामुळे टीव्हीवर ऑलिम्पिक मॅच पाहणाऱ्यांनीही हे दृश्य (Cockroach in hockey match) पाहिले. अर्थात केवळ काही क्षणांपुरतेच हे दृश्य समोर आले. यानंतर पुन्हा कॅमेरामनने मॅचवर लक्ष केंद्रित केलेलं पहायला मिळालं.

    दिरावर जडलं 2 मुलांच्या आईचं प्रेम; पुढे पतीनं जे केलं ते वाचून हैराण व्हाल

    मात्र, इंटरनेटपासून कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. मॅन (Man) नावाच्या एका ट्विटर यूझरने नेमका हा काही क्षणांचा व्हिडिओ कट करत आपल्या हँडलवरुन अपलोड केला. यानंतर हा व्हिडिओ एवढा व्हायरल (Tokyo Olympics cockroach) झाला, की आतापर्यंत याला 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. कित्येक लोक त्याला रिट्विट आणि शेअर करत आहेत. तर यावर मोठ्या प्रमाणात कमेंट्सही केल्या जात आहेत. हे झुरळही ऑलिम्पिक मॅच (Tokyo cockroach) बघायला आलं की काय? अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.

    ऑलिम्पिक स्पर्धांमधील कित्येक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ज्युडोच्या मॅचदरम्यान जर्मन खेळाडू मार्टिनाचा (Martyna Trajdos) एक व्हिडिओही असाच प्रसिद्ध होतो आहे. एका मॅचदरम्यान मार्टिनाचे प्रशिक्षक तिला कितीतरी वेळा थप्पड मारतात असं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यानंतर या प्रशिक्षकावर कित्येक नेटीझन्सनी आगपाखड केली होती. मात्र, मार्टिनाने आपण स्वतःच प्रशिक्षकांना असं करण्यास सांगितलं होतं, असं स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मान्यवरांकडून दुसऱ्या क्रमांकाच्या स्पर्धकाला गोल्ड मेडल दिलं जातं. मात्र, हे समजल्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू स्वतः आपल्या गळ्यातील पदक काढून पहिला क्रमांक पटकावलेल्या खेळाडूच्या गळ्यात घालते; असं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. या खेळाडूंनी दाखवलेल्या स्पोर्ट्समनशिपचं कौतुक लोक करत आहेत.

    First published:
    top videos

      Tags: Olympics 2021, Tokyo, Video viral