मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'बिग बॉस मराठी 2' विजेता शिव ठाकरेच्या गाडीला भीषण अपघात, अभिनेता गंभीर जखमी

'बिग बॉस मराठी 2' विजेता शिव ठाकरेच्या गाडीला भीषण अपघात, अभिनेता गंभीर जखमी

Car Accident: 'बिग बॉस मराठी 2' चा विजेता (Big Boss 2 Marathi winner) शिव ठाकरे (Shiv thakare) याच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी अमरावतीहून परतवाड्याला जात असताना हा अपघात घडला आहे.

अमरावती, 22 नोव्हेंबर: 'बिग बॉस मराठी 2' चा विजेता (Big Boss 2 Marathi winner) शिव ठाकरे (Shiv thakare) याच्या कारला भीषण अपघात (Car accident) झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी अमरावतीहून परतवाडा याठिकाणी जात असताना, एका भरधाव ट्रव्हल्सनं त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली आहे. हा अपघात इतका भयंकर होता, की शिव ठाकरे यांची कार  300 ते 400 फूट अंतर शेतात शिरली होती. या अपघातात शिव ठाकरेच्या डोळ्याच्या वरच्या बाजूला गंभीर दुखापत (Actor get injured) झाली आहे. तर या दुर्वैवी अपघातात शिव ठाकरे यांच्या बहिणीचे पती आणि बहीण यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता शिव ठाकरे याचं मुंबई याठिकाणी चित्रपटाचं शुटींग सुरू आहे. दरम्यान तीन दिवस सुट्टी असल्याने शिव ठाकरे आपल्या गावी अमरावती याठिकाणी आले होते. याच सुट्टीच्या काळात अमरावतीहून परतवाडा याठिकाणी जात असताना त्यांच्या कारला हा भीषण अपघात घडला आहे. शिव ठाकरे यांनं आपले मेहुणे, बहीण आणि भाचा यांच्यासोबत   वायगाव येथील गणपतीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते आपल्या नातेवाइकांसह परतवाड्याला निघाले होते.

हेही वाचा-Bigg Boss 15 मध्ये अभिजित बिचुकलेची स्टाईल पाहून सलमान ही दचकला

दरम्यान, वायगाव फाटा ते आष्टी दरम्यान एका मिनी ट्रॅव्हल्सनं शिव ठाकरे यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक बसताच शिव ठाकरे यांची कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात 300 ते 400 फूट आतमध्ये शिरली होती. या दुर्घटनेत शिवच्या डोळ्याच्या वरील बाजूला गंभीर दुखापत झाली असून, त्या ठिकाणी टाके घालण्यात आले आहे.

हेही वाचा- परेड सुरू असतानाच गर्दीत शिरली SUV; गाडीखाली चिरडून अनेकांचा मृत्यू, धक्कादायक घटनेचा VIDEO

आता शिव ठाकरे हे आपल्या घरी असून त्यांची प्रकृती चांगली आहे. या अपघातात शिव ठाकरेच्या बहिणीचे पती आणि बहीण यांनासुद्धा किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शिव ठाकरे यांना दुखापत झाल्याने त्याचं शुटींगचं काम काही दिवस लांबण्याची शक्यता आहे. शिव ठाकरे यांच्या गाडीला झालेल्या अपघाताची माहिती समोर येताच, चाहत्यांना धक्का बसला आहे.

First published:

Tags: Road accident