मराठी बातम्या /बातम्या /Viral /विमानात प्रवाशाने काढला मास्क, महिलेने लगावली थप्पड; पाहा VIDEO

विमानात प्रवाशाने काढला मास्क, महिलेने लगावली थप्पड; पाहा VIDEO

मास्क काढल्याचा राग आल्यामुळे महिलेनं एका ज्येष्ठ नागरिकांच्या थेट श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मास्क काढल्याचा राग आल्यामुळे महिलेनं एका ज्येष्ठ नागरिकांच्या थेट श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

मास्क काढल्याचा राग आल्यामुळे महिलेनं एका ज्येष्ठ नागरिकांच्या थेट श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

फ्लोरिडा, 28 डिसेंबर: विमानात (Flight) एका प्रवाशाने (Traveller) स्वतःच्या चेहऱ्यावरचा मास्क (Face Mask) काढल्यामुळे रागावलेल्या महिलेनं (Angry Woman) त्याच्या कानशिलात (Slapped on face) भडकावल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. कोरोनाचा प्रभाव (Corona impact) कमी झाल्याचं गेल्या काही महिन्यांत वाटत असलं तरी ओमिक्रॉनमुळे पुन्हा एकदा जगभर भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीती आणि चिंता या भावना घर करत असून स्वतःचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी ते सर्वतोपरी मदत करत आहेत. त्यामुळेच विमानात बसल्यावर मास्क काढलेल्या व्यक्तीचा महिलेला इतका राग आला की तिने त्याच्याशी थेट भांडणच उकरून काढलं. 

अशी घडली घटना

फ्लोरिडाहून टेंपासाठी जात असलेल्या विमानात एका महिलेनं अक्षरशः गोंधळ घातला. या विमानात महिलेच्या शेजारी एक ज्येष्ठ नागरिक बसले होते. त्यांनी विमानात येताना मास्क लावला होता. मात्र विमानात बसल्यानंतर त्यांनी चेहऱ्यावरून तो मास्क खाली घेतला. या प्रकारामुळे संतापलेली महिला जागेवरून उठली आणि नागरिकाशी वाद घालायला सुरुवात केली. बघता बघता हे भांडण विकोपाला गेलं आणि इतरांना मध्यस्थी करण्याची गरज निर्माण झाली. 

महिलेनं लगावली कानशिलात

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे सुुरुवातीला सुरु झालेल्या वादाचं रुपांतर हळूहळू शिवीगाळ आणि आरडाओरडा यात झालं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्याचा राग अनावर होऊन महिलेनं त्यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मात्र विमानातील कॅबिन क्रूनं पोलिसांना पाचारण केलं. पॅट्रिशिया कॉर्नवॉल असं या महिलेचं नाव आहे. 

हे वाचा -

पोलिसांनी दिलं FBIच्या ताब्यात

हे विमान जेव्हा अटलांटा विमानतळावर उतरलं, तेव्हा नागरिकांनी या घटनेचं व्हिडिओ फुटेज पोलिसांना दाखवलं. ते पाहून पोलिसांनी FBI च्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि महिलेला त्यांच्या ताब्यात दिलं. अधिकारी या घटनेची अधिक चौकशी करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

First published:
top videos

    Tags: Airplane, Viral video., Woman