मराठी बातम्या /बातम्या /Viral /OMG! तरुणाने सोबतच चालवल्या 2 सायकल; तेही खतरनाक स्टंट करत, टॅलेंट पाहून चक्रावून जाल

OMG! तरुणाने सोबतच चालवल्या 2 सायकल; तेही खतरनाक स्टंट करत, टॅलेंट पाहून चक्रावून जाल

हा माणूस एकाच वेळी दोन सायकल हाताळतो आणि अगदी मजेत दोन्ही सायकल चालवताना दिसतो.

हा माणूस एकाच वेळी दोन सायकल हाताळतो आणि अगदी मजेत दोन्ही सायकल चालवताना दिसतो.

हा माणूस एकाच वेळी दोन सायकल हाताळतो आणि अगदी मजेत दोन्ही सायकल चालवताना दिसतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई 23 मार्च : जगात टॅलेंटची कमतरता नाही आणि भारताचा विचार केला तर इथे एकापेक्षा एक टॅलेंट असलेले लोक आहेत. प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट असतं, फक्त त्याला संधी आणि व्यासपीठ मिळण्याची गरज असते. सोशल मीडियाने अशा टॅलेंटेड लोकांना सहज प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे लोकांना टॅलेंट सहज जगाला दाखवता येतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एक व्यक्ती चक्क एकाच वेळी दोन सायकल चालवताना दिसत आहे.

बापरे! तरुणांनाही जमणार नाही असा वृद्धाचा खतरनाक बाईक स्टंट, VIDEO एकदा पाहाच

अनेकदा कलाकारांची मिमीक्री करणारे, उत्कृष्ट चित्र रेखाटणारे, डान्स किंवा अनोखा स्टंट करणारे लोक अशांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत राहतात. अशा व्हिडिओंना नेटकऱ्यांची पसंतीही मिळते. आजकाल असाच एक व्हिडिओ इंस्टाग्रामवर खूप पाहिला जात आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती आपलं अनोखं टॅलेंट दाखवत आहे. व्हिडिओमध्ये हा व्यक्ती एकटाच दोन सायकल चालवताना दिसत आहे.

जिथे लोक एक सायकलही अतिशय काळजीपूर्वक चालवतात, तिथे हा माणूस एकाच वेळी दोन सायकल हाताळतो आणि अगदी मजेत दोन्ही सायकल चालवताना दिसतो. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये हा व्यक्ती आपल्या दोन्ही सायकलींनी स्टंट करतानाही दिसत आहे. हे सर्व बघून कोणाच्याही भुवया उंचावतील

असं टॅलेंट याआधी तुम्ही क्वचितच पाहिलं असेल. हा व्हिडिओ अनिल नावाच्या आयडीने इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला आहे. व्हिडिओवर लोकांच्या अनेक कमेंट्सही येत आहेत. एका यूजरने लिहिलं की, "आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही." आणखी एका यूजरने लिहिलं की, "हे टॅलेंट भारताबाहेर जाऊ नये." हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून कळवा.

First published:
top videos

    Tags: Stunt video, Viral video on social media