जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महिला डान्सरच्या चेहऱ्यावर पिस्तुल नेत तरुणाचं अश्लील नृत्य; Video समोर आल्यानंतर पोलिसांना जाग

महिला डान्सरच्या चेहऱ्यावर पिस्तुल नेत तरुणाचं अश्लील नृत्य; Video समोर आल्यानंतर पोलिसांना जाग

महिला डान्सरच्या चेहऱ्यावर पिस्तुल नेत तरुणाचं अश्लील नृत्य; Video समोर आल्यानंतर पोलिसांना जाग

पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरील एका गॅरेजमध्ये हे सर्व सुरू होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटना, 17 फेब्रुवारी : बिहारमध्ये (Bihar News) लग्नाचा सीजन सुरू केला आहे आणि लग्नसमारंभात पिस्तुल हवेत फिरवत असल्याचेही अनेक व्हिडीओ (Viral Video) समोर येत आहेत. सर्वसामान्यदेखील आनंदाच्या भरात गोळीबार करतात. आता तर हा ट्रेंडचं झाला आहे. गोपाळगंजमध्ये एक तरुण डान्सरसोबत नाचत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हि़डीओ पोलीस लाइन जवळील एका टायरच्या दुकानातील आहे. येथे कार्यक्रमात आलेल्या डान्सरसोबत तरुण शस्त्रास्त्र हातात घेऊन डान्स करीत होते. कधी तो स्वत: तर कधी दुसऱ्या तरुणाच्या हातात आपली बंदूक देऊन डान्स करीत आहे. मात्र व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची न्यूज-18 पुष्टी करीत नाही. व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पिस्तूल घेऊन डान्स करीत आहे. तो नाचताना डान्सरच्या दिशेने पिस्तुलाचं नोक फिरवतानाही दिसत आहे. जर चुकूनही त्याच्या हातातील पिस्तुलाचं ट्रिगर दाबलं गेलं असतं तर तरुणीच्या जीवावर बेतलं असतं. हे ही वाचा- कुटुंबावरील कर्ज फेडण्यासाठी 7 लाखात केला सुनेचा सौदा; लाजिरवाणी घटना… हातात पिस्तून घेऊन दारूच्या नशेत तरुण डान्स करीत आहे आणि हातात अवैध पिस्तूल फिरवित आहे. नाचताना एक तरुण डान्सरसोबत अश्लिल नृत्य करताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हे सर्व पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर घडलं आहे. मात्र पोलिसांना याबाबत काहीच कळालं नाही.

जेव्हा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा कुठे पोलिस जागे झाले. आता या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात