मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Tiktok स्टार समीर गायकवाडचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, चाहते झाले भावूक

Tiktok स्टार समीर गायकवाडचा शेवटचा व्हिडीओ आला समोर, चाहते झाले भावूक

समीर गायकवाडनं (Tik Tok Star Samir Gaikwad)  आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशात आता त्याचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.

पुणे 22 फेब्रुवारी : पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड (Tik Tok Star Samir Gaikwad)  याने रविवारी सायंकाळी पाच वाजता आत्महत्या केली. राहात्या घरी गळफास घेत 22 वर्षीय समीरनं आपली जीवनयात्रा संपवली (Samir Gaikwad Suicide). टिकटॉकनं अनेक सामान्य नागरिकानं स्टार बनवलं यातलात समीरही एक होता. त्याच्या व्हिडीओमुळे त्यानं आपली एक वेगळी ओळख निर्माण करत अनेकांची मनं जिंकली होती. त्यामुळे, त्यानी आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला. अशात आता समीरचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे.

रविवारीच समीरनं आपल्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा त्याचा शेवटचा व्हिडीओ ठरला. मात्र, या व्हिडीओमध्ये तो निराशेत असल्याचं जाणवलं नाही. या व्हिडीओमध्ये तो लोकांना एकमेकांना मागे न खेचता सहकार्य करून पुढं कसं जाता येतं, याबद्दल सांगत आहे. इतकी सकारात्मक पोस्ट शेअर करून आणि इतरांना सकारात्मकता शिकवून हा चुकीचा निर्णय का घेतला, असा सवाल समीरचे चाहते त्याच्या पोस्टवर कमेंट करत विचारत आहेत.

समीरच्या या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसला आहे. समीरनं सुसाईड नोटही सापडली नसल्यानं त्यानं आत्महत्या करण्याचा निर्णय का घेतला, हे स्पष्ट होऊ शकलं नाही. समीरच्या भावानं याबद्दल पोलिसांनी माहिती देताच पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.

First published:

Tags: Instagram post, Suicide, Tiktok star