रुग्णाला तातडीने रुग्णालयात पोहोचविणं खूप आवश्यक असतं. मात्र रुग्णवाहिकांना रुग्णालयांपर्यंत पोहोचणं नेहमीच सोपं नसतं. अनेकदा वाहतुकीचा खोळंबा आणि काही बेशिस्ट कारचालकांमुळे रुग्णवाहिकांना जलद गतीने गाडी चालविणं अवघड जातं. मात्र युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom) काही लोकांना असं काम केलं आहे की, ज्यामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. या नागरिकांना रस्त्यात रुग्णवाहिका पाहून (Ambulance) रस्ता रिकामी करण्यास मदत केली. रुग्णवाहिकेतील रुग्णाला तातडीने उपचार मिळावेत यासाठी नागरिक आपल्या गाडीतून खाली उतरले व त्यांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे.
हे ही वाचा- ‘मी मरेन पण कुत्र्याला मरू देणार नाही!’; कोरोनाच्या संकटात भावुक करणारा VIDEO रुग्णवाहिकेच्या डॅशकॅममध्ये कैद झालेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर गाड्यांमधील लोक बाहेर पडत असून रुग्णवाहिकेसाठी रस्ता रिकामी करीत आहे. टिकटॉकवर शेअर केलेली ही क्लिप जलद गतीने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.