'मी मरेन पण कुत्र्याला मरू देणार नाही!'; कोरोनाच्या संकटात भूतदया दाखविणारा VIDEO

'मी मरेन पण कुत्र्याला मरू देणार नाही!'; कोरोनाच्या संकटात भूतदया दाखविणारा VIDEO

कोरोनाच्या संकटात सर्वचजणं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यात हा व्हिडिओ तुम्हाला भावुक करेल.

  • Share this:

Dog Viral Video : कोरोनाव्हायरस (Coronavirus Pandemic) झपाट्याने वाढत असल्याने नागरिक स्वत:बरोबरच आपल्या प्राण्यांचीही काळजी घेत आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या प्राण्याला घरी आणता तेव्हा त्याची काळजी घेणं ही तुमची जबाबदारी असते. अधिकतर प्राणी पालक कुत्र्यांना (Dog With Mask) आपल्या सोबत ठेवणं पसंत करतात. कुत्र्यांमधील (Dog Wearing Mask) प्रामाणिकपणा आणि निरागसपणामुळे पालकांचं आपल्या कुत्र्यावर खूप प्रेम असतं. सोशल मीडियावर असे व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत आहेत. इंटरनेटवर सध्या तुफान व्हायरल होणारा हा व्हिडिओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत. या व्हिडिओत एक गरीब व्यक्ती खाद्यांवरुन आपल्या कुत्र्याला घेऊन जात आहे, विशेष म्हणजे यावेळी कुत्र्याला मास्क लावण्यात आलं आहे.

खांद्यावर कुत्र्याला मास्क लावून बसवलं

कोरोना व्हायरसचा संसर्ग (Coronavirus) वाढत असल्याने नागरिक स्वत:बरोबरच आपल्या नातेवाईकांचा वाचविण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. इतकच नाही तर काहींनी आपल्या प्राण्यांना या महासाथीतून वाचविण्यासाठीही तयारी सुरू केली आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका गरीब व्यक्तीने खाद्यांवर आपल्या कुत्र्याला बसवलं आहे. आणि त्याच्या तोंडावर मास्क लावला आहे. त्याचवेळी दुसरी एक व्यक्ती त्याला कुत्र्याला मास्क लावण्याबद्दल विचारते. त्यानंतर गरीब व्यक्ती जे काही उत्तर देतो, त्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

हे ही वाचा-पोलिसांनी भररस्त्यात तरुण-तरुणीला घातली गोळी; व्हायरल VIDEO मागील काय आहे सत्य?

व्यक्तीनी दिलेल्या उत्तरामुळे लोक भावुक

खाद्यांवर कुत्रा घेऊन चाललेल्या व्यक्तीला विचारलं की तुझं नाव काय आहे? यावर तो म्हणाला मोहन लाल देवांगन, त्यानंतर कुत्र्याचं नाव विचारलं तर तो म्हणाला, पुरू..जेव्हा त्याला विचारलं की तू मास्क नाही लावला, मात्र कुत्र्याला लावलास..यावर त्याचं उत्तर ऐकून अनेकजण भावुक झाले. ती गरीब व्यक्ती म्हणाली की, मी मरेन पण कुत्र्याला नाही मरू देणार. माझं बाळ आहे..लहानपणापासून याचा सांभाळ केला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: April 16, 2021, 5:50 PM IST

ताज्या बातम्या