जाहिरात
मराठी बातम्या / Viral / प्रसिद्ध कंपनीच्या शाकाहारी बर्गरमध्ये आढळला मांसाचा तुकडा; चूक लपवण्यासाठी केला भलताच प्रताप

प्रसिद्ध कंपनीच्या शाकाहारी बर्गरमध्ये आढळला मांसाचा तुकडा; चूक लपवण्यासाठी केला भलताच प्रताप

प्रसिद्ध कंपनीच्या शाकाहारी बर्गरमध्ये आढळला मांसाचा तुकडा; चूक लपवण्यासाठी केला भलताच प्रताप

हा व्यक्ती सकाळी साडेअकराच्या सुमारास मॅकडोनाल्डला पोहोचला तेव्हा त्याने स्वत:साठी दोन मॅकप्लांट बर्गर ऑर्डर केले, जे पूर्णपणे शाकाहारी बर्गर आहेत. पण जेव्हा त्याने बर्गर खायला सुरुवात केली तेव्हा त्यातून एक रबरासारखी वस्तू बाहेर आली

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 17 एप्रिल : रेस्टॉरंट्स आपल्या ग्राहकांना किती सतर्कतेनं आणि सफाईसोबत जेवण सर्व्ह करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा ज्या रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ मिळतात, तिथे स्वच्छता अजिबात पाळली जात नाही. इथे एका प्रकारच्या जेवणाची भांडी दुसर्‍या प्रकाच्या डिशसाठी वापरणं सामान्य आहे. परंतु अलीकडेच एका रेस्टॉरंटने शाकाहारी व्यक्तीच्या बर्गरमध्ये मांसाहारी पदार्थाचा तुकडा टाकून मर्यादाच ओलांडली. पण आपली चूक झाकण्यासाठी त्यांनी जे काही केलं ते जास्तच हैराण करणारं होतं (Vegan found Meat in Veg Burger) . VIDEO: महिलेकडून भररस्त्यात फूड डिलिव्हरी बॉयला चपलेनं जबर मारहाण; नेमकं काय आहे प्रकरण? डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, इंग्लंडमधील कोल्डफिल्डमधील लोअर परेडमध्ये मॅकडोनाल्डची शाखा आहे. इथे 13 एप्रिल रोजी एक 37 वर्षीय व्यक्ती बर्गर खायला गेला होता. तो व्यक्ती पूर्णपणे शाकाहारी होता. तो व्यक्ती वीगन होता. असे लोक दूध, चामडे इत्यादी प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रोड्क्टसाची वापर करत नाहीत.

News18

हा व्यक्ती सकाळी साडेअकराच्या सुमारास मॅकडोनाल्डला पोहोचला तेव्हा त्याने स्वत:साठी दोन मॅकप्लांट बर्गर ऑर्डर केले, जे पूर्णपणे शाकाहारी बर्गर आहेत. पण जेव्हा त्याने बर्गर खायला सुरुवात केली तेव्हा त्यातून एक रबरासारखी वस्तू बाहेर आली, जी त्याने काढून वेगळी केली. सुरुवातीला ती वस्तू टोमॅटोसारखी वाटली, म्हणून त्या व्यक्तीने काही विशेष प्रतिक्रिया न देता पुन्हा आपलं बर्गर खायला सुरुवात केली. पण जेव्हा त्या व्यक्तीने प्लेटमध्ये ठेवलेली वस्तू पाहिली तेव्हा त्याला तेव्हा त्याला धक्का बसला. कारण हे बेकन म्हणजे डुकराचं मांस होतं (Man finds Bacon in McDonald’s Burger). पती-पत्नीने दुसऱ्या देशातून दत्तक घेतलं बाळ; DNA टेस्ट करताच सरकली महिलेच्या पायाखालची जमीन या व्यक्तीला हे पाहून खूप किळस वाटली आणि त्याने काउंटर गाठून याबाबत तक्रार केली. हे संपूर्ण प्रकरण ऐकून मॅकडोनाल्डच्या कर्मचाऱ्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी त्या व्यक्तीची माफी मागितली आणि लगेच त्याला 500 रुपयांचं व्हाउचर दिलं, म्हणजे चूक झाकण्यासाठी एक प्रकारचा डिस्काउंट दिला, जो तो पुढच्या वेळी येताना वापरू शकेल. रिपोर्टनुसार, व्यक्ती 11 वर्षांपासून फक्त मासे खात असे, इतर कोणतंही मांस तो खात नव्हता आणि गेल्या 2 वर्षांपासून तो पूर्णपणे शाकाहारी बनला होता. मी मांस खाल्लं याचा मला खूप पश्चाताप झाल्याचं या व्यक्तीने म्हटलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात