मुंबई, 14 फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी तरुणीने आणि तिच्या आईने रोडरोमियोला चांगलाच चोप दिल्याची घटना समोर आली आहे. नालासोपाऱ्यातील आचोळे रोड येथे तरुणीची छेड काढणाऱ्या एका रोड रोमियोला तरुणीने आणि तरुणीच्या आईने भर रस्त्यात कायमची अद्दल घडवली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आज व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना त्याच्या पूर्व संध्येला पोरींची येता जाता छेडछाड काढणाऱ्या रोडछाप रोमिंयोंची काही कमी नाही. काही मुली हा त्रास सहन करतात, पण काही मुली सहन न करता त्या रोड रोमियोला कायमची अद्दल घडवतात. व्हॅलेंटाईन डेला काहीतरी तुफानी करते हैं… च्या आवेशात गेलेल्या अशाच एका रोड रोमियोला चांगलेच महागात पडले आहे.
हे ही वाचा : समलैंगिक ॲपवरून ओळख, IITच्या विद्यार्थ्यासोबत लैंगिक अत्याचार, तंत्रविद्येचाही वापर, मुंबईतील हादरवणारी घटना
नालासोपाऱ्यात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणला भर रस्त्यात बेदम चोप देण्यात आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नालासोपारा पूर्व आचोळे रोड लेन परिसरात काल सायंकाळच्या सुमारास मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला त्या तरुणीने आणि तिच्या आईने चांगलीच मारहाण केली.
या मुलीने आणि तिच्या आईने या तरुणाला लाथा बुक्क्यांनीही मारल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी संगितलं. पीडित मुलगी आणि तिची आई या तरुणाला मारहाण करतानाचा सर्व प्रकार एका मोबाईल कैमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान तुळींज पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. तसेच पीडित मुलगी आणि तरुण यांच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते, अशा प्रकारची टवाळकी करणाऱ्या तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय अशी तक्रार या परिसरातील नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मुलींची छेड काढण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पोलिसांनी अशा रोड रोमियोंना कायमची अद्दल घडवावी अशी मागणी नागरिकांनी केली.