जाहिरात
मराठी बातम्या / Viral / जंगल सोडून अस्वल कुटुंबासह शहरात आलं वस्तीला, VIDEO पाहून नागरिकांची वाढली धडधड

जंगल सोडून अस्वल कुटुंबासह शहरात आलं वस्तीला, VIDEO पाहून नागरिकांची वाढली धडधड

जंगल सोडून अस्वल कुटुंबासह शहरात आलं वस्तीला, VIDEO पाहून नागरिकांची वाढली धडधड

जंगल सोडून अस्वल शहरात यायाला लागल्यानं नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चमोली, 31 ऑक्टोबर : जंगलांमधून अनेकदा वाघ शहरात येऊन शिकार करून जात असल्याचा घटना समोर येत असतानाच आता अस्वलांचा धुडगूस सुरू झाला आहे. अस्वल आपल्या कुटुंबासह शहरात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. वाघ आणि हत्तीच्या हल्लात आतापर्यंत 60 जणांचा मृत्यू तर अस्वलाच्या हल्ल्यात सोळाशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. याच आठवड्यात चमोलीमध्ये अस्वलाच्या हल्ल्यात तीनहून अधिक लोक जखमी झाले. त्याचबरोबर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अस्वलाचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता उत्तराखंडमधील चमोली परिसरात ही घटना समोर आली आहे. अस्वल आपल्या कुटुंबाला घेऊन चमोली जिल्ह्यातील जोशीमठ परिसरातील फिरताना दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे वाचा- 2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली मशीदमध्ये, समोर आला भीषण अपघाताचा LIVE VIDEO जंगल सोडून अस्वल शहरात यायाला लागल्यानं नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून वाघ आणि हत्तीच नाही तर अस्वलांचेही हल्ले वाढत असल्याचं नागरिकांनी सांगितलं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी अस्वलाचे शहरात घुसण्याचं प्रमाण वाढत असल्यानं चिंता व्यक्त केला आहे. नविभागाच्या आकडेवारीनुसार यावर्षी ऑगस्टपर्यंत अस्वलाच्या हल्ल्यात दोन जण ठार तर पन्नास जखमी झाले आहेत. तर 2000 ते 2019 पर्यंत अस्वलाच्या हल्ल्यात 1,575 लोक जखमी झाले आहेत. यावेळी अस्वलाच्या हल्ल्यात 56 लोक ठारही झाले. उत्तराखंड वनविभागाचे प्रमुख जयराज यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, वनविभाग याबाबत गांभीर्याने विचार करीत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात