2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली मशीदमध्ये, समोर आला भीषण अपघाताचा LIVE VIDEO

2 बॅरिकेट्स तोडून कार घुसली मशीदमध्ये, समोर आला भीषण अपघाताचा LIVE VIDEO

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली मशीद नुकतीच सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर हा अपघात घडला.

  • Share this:

ृदुबई, 31 ऑक्टोबर : भरधाव वेगानं कार घेऊन जाणाऱ्या एका तरुणानं सर्व बॅरिकेट्स तोडून थेट कार मशीदमध्ये घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन बॅरिकेट्स तोडून ही कार मशीदच्या गेटवर जाऊन धडकली आणि मोठा गोंधळ उडाला. ही घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडल्याची माहिती मिळाली आहे.

सौदी अरबमध्ये एका व्यक्तीनं मक्का इथल्या अल-हरम सर्वात मोठ्या मशीदच्या प्रवेशद्वारावर कार ठोकली. शुक्रवारी रात्री 10.25 मिनिटांनी हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अधिकाऱ्यांनी स्थानिक मीडियाला दिलेल्या माहितीनुसार कार चालकाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या माणसाची प्रकृती ठिक नव्हती. अपघातानंतर याची माहिती सुरक्षा दलाला मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि कार तिथून हटवण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-अजब आहे राव! जीव वाचवण्यासाठी म्हशीचं मुंडण, नेमका काय आहे प्रकार पाहा VIDEO

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बंद ठेवण्यात आलेली मशीद नुकतेच सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर हा अपघात घडला आहे. फैजल नावाच्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक गाडी अतिशय वेगाने येताना दिसत आहे. कारने मशीद अल-हारमच्या गेट नंबर 89 ला जोरदार धडक दिली. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की कारची टक्कर होताच लोकांनी मशिदीच्या गेटकडे धाव घेतली. तेथे उपस्थित लोकांनी कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: October 31, 2020, 2:21 PM IST

ताज्या बातम्या