कहरच! पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, 7 महिन्यांनी घरी परतली अन्...

कहरच! पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली, 7 महिन्यांनी घरी परतली अन्...

पतीच्या नावाने तयार केला बॉयफ्रेंडचा पासपोर्ट, ऑस्ट्रेलियाला गेली खरी पण लॉकडाऊनमुळे फुटलं भांडं.

  • Share this:

पीलीभीत (उत्तर प्रदेश), 31 ऑगस्ट : उत्तर प्रदेशच्या पीलीभीत गावात एक अजब घटना घडली. येथील एक महिला आपल्या पतीच्या पासपोर्टवर घरी खोटं सांगून बॉयफ्रेंडसोबत ऑस्ट्रेलियाला गेली. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ही महिला तिथेच अडकली. त्यानंतर तिच्या पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाबद्दल माहिती मिळाली. मुख्य म्हणजे ही महिला घरी मैत्रीणींसोबत फिरायला जात असल्याचे सांगून गेली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 6 जानेवारी रोजी पतीच्या पासपोर्टवर बनावट कागदपत्रं तयार करून बॉयफ्रेंडसोबक ऑस्ट्रेलियाला गेली. मार्चमध्ये पुन्हा भारतात परतण्याचा त्यांचा प्लॅन होता. मात्र लॉकडाऊनमुळे दोघे तिकडेच अडकले. आता अनलॉकनंतर ही महिला 24 ऑगस्ट रोजी भारतात परतली. भारतात परतल्यानंतर पतीला पत्नीच्या प्रेमसंबंधाबाबत कळलं आणि त्यानं पोलिसात तक्रार केली.

वाचा-...आणि महिलेच्या शरीरात शिरला 4 फूट लांब साप, विश्वास बसत नसेल तर पाहा VIDEO

पतीच्या तक्रारीनंतर पोलीस अधिक्षक जय प्रकाश यादव यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश देऊन दोघांविरुद्ध तक्रार नोंदवली. गेल्या 20 वर्षांपासून महिलेचा पती मुंबईत कामानिमित्त राहत होता. पत्नीला भेटण्यासाठी तो आपल्या गावी पीलीभीतला जात होता.

वाचा-बापरे! लग्न लागत असतानाच वर-वधूवर कोसळली वीज, थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर या महिलेचा पती गावी परतला. तेव्हा त्याला कळले की पत्नी ऑस्ट्रेलियाला गेली आहे. पत्नीनं घरी पतीसोबत फिरायला जात असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी केलेल्या तपासणीत या महिलेनं आणि तिच्या बॉयफ्रेंडनं महिलेच्या पतीच्या नावाने 2 फ्रेबुवारी 2019 रोजी पासपोर्ट तयार केल्याचे कळले. त्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला.

वाचा-...आणि 2 किमी गाडीच्या बोनेटवर झोपून आरोपीला पकडलं, पाहा खऱ्या सिंघमचा VIDEO

सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून त्या महिलेला आणि तिच्या बॉयफ्रेंडला फसवणूकीच्या गुन्ह्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 4:06 PM IST

ताज्या बातम्या