Home /News /viral /

काळ आला होता पण...ट्रेननं सायकलस्वाराला दिली धडक पण थोडक्यात बचावला जीव, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

काळ आला होता पण...ट्रेननं सायकलस्वाराला दिली धडक पण थोडक्यात बचावला जीव, पाहा अंगावर शहारे आणणारा VIDEO

बरीच मेहनत घेतल्यानंतर त्या युवकाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे.

    मऊ, 27 सप्टेंबर : काही दिवसांपूर्वी रेल्वेखाली दीड वर्षांच्या चिमुकला फेकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखीन एक अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ समोर आला आहे. रेल्वे गाडीखाली एक सायकलस्वार आल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रेल्वे गाडी रुळावरून जात असताना अचानक सायकलस्वार आला आणि अपघात झाला. या घटनेमध्ये तरुण इंजिनच्या खाली गेला. मोटारमननं शर्थीचे प्रयत्न करून या तरुणाला बाहेर काढलं आहे. थोडक्यात मोठी दुर्घटना टळली असून या धडकेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे वाचा-अख्खं आयुष्यचं बदललं; 'बालिकावधू'च्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ बरीच मेहनत घेतल्यानंतर त्या युवकाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला 108 रूग्णाच्या रूग्णालयात उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील मऊ इथे घडली. सायकलस्वार रेल्वे ट्रॅक ओलांडून जात असताना ही दुर्घटना घडली. वारंवार रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळ ओलांडून नये असं आवाहन करूनही रेल्वे रूळ ओलांडण्याचं धाडस केलं जातं आणि हे धाडस या तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Uttar pradesh

    पुढील बातम्या