मुंबई, 27 सप्टेंबर : अनेक प्रसिद्ध कलाकारांवर लॉकडाऊनच्या काळात बिकट परिस्थिती उद्भवल्याच्या बातम्या आपण गेल्या काही दिवसांत ऐकल्या व वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा समोर आली आहे. 'बालिकावधू' या प्रसिद्ध मालिकेच्या दिग्दर्शकावर भाजी विकण्याची वेळ आली आहे.
दिग्दर्शक रामवृक्ष गेल्या अनेक महिन्यांपासून उत्तर प्रदेशातील आपल्या घरीच होते. अखेर कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी भाजी विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
मात्र अशा बिकट परिस्थितीतही रामवृक्ष यांचं म्हणणं आहे की, रिअल आणि रील लाइफ दोन्ही पाहावं लागतं. लॉकडाऊनमध्ये आपल्या मुलांच्या परीक्षेसाठी रामवृत्र आता मुंबईला येत नाहीत. कुटुंबाची जबाबदारी इतकी आहे की मुंबईत चित्रपटांचे काम बंद असल्याने त्यांना भाजी विकून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करावा लागत आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा-दीपिका, साराच्या मोबाइलमधुन सत्य होईल उघड; या सुपरस्टार अभिनेत्रींना NCB चा दणका
एका मुलाखतीदरम्यान रामवृक्ष यांनी त्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती कथन केली. मात्र ही परिस्थिती सुधारेल आणि आम्ही पुन्हा आधीचं जीवन सुरू होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यांची पत्नी अनिता गौड यांनी सांगितले की, परिस्थिती बिघडली असली तरी काही चिंता नाही. आज नाहीतर उद्या परिस्थिती सुधारेल ही आशा आहे. तर त्यांची मुलगी नेहा म्हणते की, परिस्थिती सुधारल्यानंतर आम्ही पुन्हा मुंबई मित्रमैत्रिणींसोबत शाळेत जाऊ. 25 हून अधिक मालिका आणि चित्रपट दिग्दर्शनामध्ये काम केलेल्या रामवृक्ष यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये त्यांचं अख्खं आयुष्यचं बदललं. आता ते भाजी विकण्याचे काम करीत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.