कौशांबी, 18 जुलै : एखाद्या माणसाला प्रशासनाकडून नाहक त्रास झाला तर तो प्रशासनाचा कसा निषेध करेल सांगता येत नाही. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्याच्या सराय अकील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशी एक विचित्र घटना समोर आली आहे. एक व्यक्ती हाय टेन्शन विजेच्या तारा असणाऱ्या टाॅवरवरच चढला. विज वितरणाच्या एका कर्मचाऱ्याने ही घटना पाहिल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ माजला. संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांकडून पोलिसांना माहिती मिळाली की, नंदा का पुरा या गावातील रहिवासी अशोक निषाद याने वाढीव (Electricity Bill) विजेचं आल्यामुळे त्याने हे पाऊल उचललं आहे. पोलिसांनी जाळं फेकून त्याला पकडलं आणि 5 तासांच्या अखंड मेहनतीनंतर त्याला खाली उतरविण्यात यश आलं. (Viral News in UP) वाचा : अजूनपर्यंत आम्ही संयम बाळगलाय, पण आता ठाकरे.. संजय राऊत यांचा शिंदे गटाला इशारा समोर आलेली माहिती अशी की, वीज वितरण विभागाच्या अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या तक्रारीचं ताबडतोब निवारण केलं जाईल असं आश्वासन मिळल्यानंतर तो व्यक्ती खाली उतरण्यास तयार झाला. अशोक निषादची पत्नी मोना देवी यांनी दावा केला की, वीज वितरण विभागाकडून विजेचं बील वाढवून आल्यामुळे पती तणावात होते. दोन दिवसांपूर्वीच तब्बल 80,700 रुपये विजेचं बील आलेले होतं. त्या तणावात खाणंपिणंही सोडून दिलेलं होतं." वाचा : Google News: गुगल न्यूजवर आपल्या भाषेत बातम्या कशा वाचायच्या? प्रोसेस आहे खूपच सोपी अशोकच्या पत्नी असाही आरोप केली की, वीज वितरण कंपनीकडून घरातील वीज कापण्यात आली. यासंदर्भात अधिकाऱ्यांना तक्रार द्यायला गेल्यानंतर कुणीही दाद दिली नाही. त्यामुळे माझा पती हाय टेन्शन पावर लाईनवर चढलेला होता. पोलिसांनी घटनेची माहिती दिली, तेव्हा पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून या व्यक्तीला वाचविण्यात आलं. पोलीस अधिकारी समर बहादुर म्हणाले की, “संबंधित व्यक्तीच्या घरातचं वीज तब्बल 80 हजार आलेलं पाहून व्यक्तीचं मानसिक संतुलन ढासळलं. त्यामुळे ही व्यक्ती हायहोल्टेज पावर लाईनच्या टाॅवरवर चढली होती. संबंधित व्यक्तीला 5 तासांच्या प्रयत्नांनतर हाय टेन्शन पावर लाईनवरून खाली उतरविण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.