लखनऊ, 19 फेब्रुवारी: सध्या सोशल मीडियाचा प्रचंड वापर होत आहे. हे दुहेरी शस्र आहे त्याचा वापर करावा तसं ते फायदेशीर किंवा नुकसानकारक ठरतं. उत्तर प्रदेश पोलिसांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट राज्यातल्या गुंडांनाच संदेश दिला आहे. मीम्स सध्या सोशल मीडियावरचा सर्वोत्तम पर्याय आहे. 2011 मध्ये अजय देवगण आणि काजल अग्रवाल यांचा सिंघम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यात राजकारण्यांविरुद्ध लढणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कथा दाखवण्यात आली होती. त्यात गुंड अभिनेत्रीची छेड काढतात आणि सिंघम येऊन त्यांची धुलाई करतो असा एक सीन होता. त्याच सीनमधल्या तीन क्लीप्स घेऊन पोलिसांनी एक नवा मीम तयार केला आहे. पोलिसांनी ट्विट केलेल्या मीममध्ये एक गुंड काजलची छेड काढताना दिसतो आणि तिच्या आजोबांना म्हणतो, ‘म्हाताऱ्या तुला कुणाला बोलवायचं त्याला बोलवं’. त्यात ‘ये छेडखानी करनेवाले हैं’ अशी कॅप्शन दिली आहे. पुढे सिंघम आणि काजल बुलेटवरून येताना दिसतात. इथे व्हिडिओत ‘ये हम है’ अशी कॅप्शन दिली आहे. व्हिडिओच्या पुढच्या भागात सिंघममधला गुंड सिंघमला विचारतो ‘तेरे को पता है मैं कौन हूँ?’ आणि शेवटच्या सीनमध्ये त्या सगळ्या गुंडांना पोलिसांनी पकडलेला फोटो आहे त्यावर लिहिलंय ‘अब पुलिस के साथ इनकी PAWARI होगी.’ यात पावरी म्हणजे पार्टी होणार असं म्हणायचं आहे.
यूपी पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून 16 फेब्रुवारीला हे ट्विट टाकण्यात आलं आहे. त्याला पावरी विथ पोलीस? अशी कॅप्शन दिली असून, #PawariHoRahiHai हा हॅशटॅगही देण्यात आला आहे. 27 सेकंदांचं हे मीम प्रचंड लोकप्रिय झालंय आणि आतापर्यंत त्याला 305.5K व्ह्युज, 1.2 K प्रतिक्रिया, 6.9K रिट्विट आणि 27.8 K लाइक्स देखील मिळाले आहेत. या ट्विटवर मस्त प्रतिक्रिया येत आहेत. रितिका नावाच्या हँडलवरून हे नेक्स्ट लेव्हल पार्टिइंग आहे अशी प्रतिक्रिया आली आहे. अनेकांनी यूपी पोलिसांनी दाखवलेल्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक केलं आहे.
The next level of #PawriHoRaiHai 🤣 https://t.co/zosDNuHbXg
— Ritika (@RitikaGhosh) February 17, 2021
हे मीम नवी दिल्लीच्या डीसीपींच्या ट्विटर हँडलला टॅग करून दिल्लीतील पोलीस इन्स्पेक्टर सोनम जोशींनी प्रश्न केला आहे की दिल्ली पोलीसांसोबतची पार्टी कुठं आहे?
एका वापरकर्त्याने तर प्रश्न विचारलाय की प्रोफेशनल मीमर्स नोकरी सोडू का असं विचारायला लागलेत.(म्हणजे पोलिसांनी इतका प्रोफेशनल मीम बनवला आहे.) काहींनी मात्र पोलिसांना सल्ला दिला आहे की अशा पद्धतीच्या ट्वीटचा चुकीचा परिणाम होऊन ते महागात सुद्धा पडू शकतं.
Memers be like : Hum kyaa kre job chhod de? https://t.co/87TN6vpLVu
— आयुषी 🙈 (@peraxetamol) February 17, 2021
त्यांनी पोलिसांना असाही सल्ला दिला की यूपी पोलिसांनी नवी पीआर टीम कामाला ठेवावी.
यूपीच्या एटीएस विभागातील अडिशनल एसपी राहुल श्रीवास्तव यांनी या व्यक्तीला सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत आणि हे मीम पीआर टीमनी नाही तर पोलिसांनीच केल्याचा खुलासा केला आहे. ते वाचून सल्ला देणारा ट्विटर युजर मात्र अवाक झाला आहे.
रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टींमुळे तुम्हाला त्रास होणार असेल तर आम्हाला 112 टोल फ्री क्रमांकावर फोन करा हे सांगण्यासाठीही यूपी पोलिसांनी हा पावरीचा ट्रेंड वापरला होता. पोलिस सोशल मीडिया सॅव्ही होत असून त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे.