उत्तराखंड, 25 ऑगस्ट: मुसळधार पावसामुऴे उत्तर भारतात अनेक ठिकाणी महापुराचं संकट असताना हिमाचल आणि उत्तराखंड परिसरात वारंवार भूस्खलनाच्या घटना समोर येत आहे. सोमवारी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं उत्तरकाशी इथल्या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. हे भूस्खलन खूप मोठ्या प्रमाणात झाल्यानं माती, दगड, झाडं आणि मलबा महामार्गावर आला आहे.
भूस्खलन होत असताना जवळपास अनेक लोक आपल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद करत होते. मोठ्या प्रमाणात डोंगराचा हिस्सा कोसळू लागल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली आणि पळापळ सुरू झाली. डोंगरावरची झाडं देखिल उन्मळून पडली आहेत. ह्या संपूर्ण भूस्खलनाचा लाईव्ह व्हिडीओ समोर आला आहे.
Uttarakhand: Rishikesh-Gangotri National Highway (NH-94) blocked near Narendra Nagar following a landslide triggered due to heavy rainfall in the area. Road clearance operation underway. pic.twitter.com/wgDCP02Cs2
उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं मोठ्या प्रमाणात रस्त्यावर माती आणि दगड आले आहेत. हे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. नरेंद्र नगरजवळ ऋषिकेश-गंगोत्री राष्ट्रीय महामार्ग बंद झाला आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून सध्या माती हटवण्याचं काम सुरू असल्यानं या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.