संभळ (राजघाट), 31 ऑक्टोबर : मुंज किंवा जावळ करताना लहान मुलांचं मुंडण केलं जातं. इतकंच नाही तर निषेध नोंदवण्यासाठी किंवा एखादा व्यक्ती गेल्यानंतर देखील मुंडण करण्याची प्रथा आहे. पण एखाद्या प्राण्याचं मुंडन केल्याचं कधी ऐकलं आहे का? चक्क असाच एक धक्कादायक आणि अजब प्रकार समोर आला आहे. इतकच 500 लोकांनी एकत्र येऊन जेवण देखील केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुलाचे मुंडण करण्याचे आमंत्रणपत्रे तुम्ही बरीच पाहिली असतील आणि बर्याच मेजवानीही खाल्ल्या असतील, पण हे आमंत्रण म्हशीच्या मुंडणासाठी एका शेतकऱ्यानं दिलं आहे. या सोहळ्यासाठी जवळपास 500 जण उपस्थित होते. हा सोहळा उत्तर प्रदेशातील गन्नूर गंगा घाटावर औपचारिक पद्धतीनं पार पडला. एवढेच नव्हे तर मुंडननंतर शेतकऱ्याने सुमारे पाचशे लोकांना मेजवानीही दिली. या कार्यक्रमासाठी शेतकऱ्याने खास पत्रिका वाटून आमंत्रणही दिलं आहे.
संभल में अनोखा मुंडन संस्कार
ग्रामीण ने गंगा घाट पर कराया भैंस का मुंडन संस्कार
कार्ड छपवा कर लोगों को किया आमंत्रित।
भैंस का मुंडन करा कर लोगों को खिलाई दावत।भैंस के बच्चे जीवित नहीं होने पर श्राप से बचने को कराया मुंडन संस्कार।
नंदरौली इथला रहिवासी असलेला शेतकरी नेम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हशीला रेडकू झाल्यानंतर काही काळातच त्याचा मृत्यू व्हायचा. ही समस्या सातत्यानं जाणवत होती. यासाठी त्याने त्याच्या दारी आलेल्या साधूला समस्या विचारली आणि या साधूंनी त्याला म्हशीसह रेडकूचं मुंडण करण्याचा सल्ला दिला. यामुळे म्हैस आणि रेडकू दोघंही सुखरुप राहतील असंही सांगितल्याचा दावा शेतकऱ्यानं केला आहे.
साधूने सांगितल्याप्रमाणे या शेतकऱ्यानं म्हैस आणि रेडकू यांचा थाटामाटात मुंडण सोहळा केला आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर राजघाटात हा सोहळा पार पडला. हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंडण सोहळ्याला 100 तर जेवणासाठी 500 लोक उपस्थित होते. उत्तर प्रदेशात या मेजवानीची मात्र तुफान चर्चा रंगली आहे.