नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : ब्लॅक पँथर प्रजातीतला वाघ भारतातील काही भागांमध्ये आजही पाहायला मिळतो फक्त त्याचं सहज दर्शन होणं अगदी दुर्मीळ आहे. जंगलात मुक्तपणे संचार करणाऱ्या ब्लॅक पँथरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. गमतीचा मुद्दा असा की यावेळी रस्त्यानं जाणाऱ्या गाडीला हा वाघ भारी लूक देऊन जातो आणि याची दृश्यं कारचालकानं आपल्या कॅमेऱ्यात टिपली आहेत. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जंगलाच्या मध्यभागी रस्त्यावर जात असलेल्या कारला पाहून पँथरनं दिलेली रिअॅक्शन सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या पँथरचा व्हिडीओ IFS अधिकारी प्रवीण कसवान यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रवणा कसवान यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की हा व्हिडीओ नेमका कुठल्या परिसरातला आहे ते सांगता येणार नाही. पण भारतात काही ठिकाणी ही प्रजाती दिसून आली आहे.
The black panther of India. Location will not be revealed. Forwarded by staff. pic.twitter.com/q2fXW8Et3e
हा व्हिडीओ 166 हजार लोकांनी पाहिला असून दीड हजारहून अधिक लोकांनी रिट्वीट केला आहे. य़ा व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की ब्लॅक पँथर झाडांच्या मागे लपलेला आहे. तेवढ्यात, एक कार जंगलातून जात असलेल्या रस्त्यावर आली आणि ब्लॅक पॅंथर पाहिल्यानंतर दोन क्षण थांबली. गाडी पाहून ब्लॅक पँथर दोन क्षण थांबला. त्याचवेळी काही लोक कारमध्ये बसून हा व्हिडिओ शूट करत आहेत. ब्लॅक पँथरचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काही लोक असा अंदाज लावत आहेत की हा भारताच्या कोणत्याही प्रदेशातील आहे. काही लोकांनी हा व्हिडीओ नेपाळमधील असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.